मित्रांनो, नवरात्र हा आदिशक्ती कालिमातेचा उत्सव आहे. त्यातून तिच्या विविध रूपांचा आपल्याला परिचय होतो. स्त्रीची विविध रूपे हा आजच्या कोडय़ाचा विषय आहे. उदाहरणार्थ, अध्यापिका म्हणजेच शिक्षिका या स्त्री रूपाची तुम्हाला शालेय जीवनात ओळख आहेच. नातेसंबंधातील स्त्रीची प्रमुख रूपे आपण ‘अ’ गटात घेणार आहोत. ‘ब’ गटात तुम्हाला सुप्रसिद्ध गाण्यांच्या ओळी दिलेल्या आहेत. या गाण्यांतील ओळी ‘अ’ गटातील कुठल्या स्त्री रूपाशी संलग्न आहेत याच्या जोडय़ा तुम्हाला लावायच्या आहेत.                                 
अ गट
माता, बहीण, भावजय, मैत्रीण, आजी, मुलगी, स्नुषा, नवरी
ब गट
१) नको ताई रुसू, कोपऱ्यात बसू
येऊ दे गं गालात खुदकन हसू
२) कल्पवृक्ष कन्येसाठी
 लावुनिया बाबा गेला,
वैभवाने बहरून आला,
याल का हो बघायाला
३) मायेविण बाळ क्षणभरी न राहे।
न देखतां होय कासावीस॥
४) तुझी नि माझी गंमत वहिनी ऐक सांगते कानात
आपण दोघी बांधू या गं
दादाचं घर बाई उन्हात
५) आईसारखे दैवत साऱ्या
 जगतावर नाही
म्हणून श्रीकाराच्या नंतर
शिकणे अ, आ, ई
६) पिवळी पिवळी हळद लागली
भरला हिरवा चुडा
वधु लाजरी झालीस तू गं सांगे तो चौघडा!
७) चला सख्यांनो हलक्या हाते,
नखांनखांवर रंग भरा गं
नखांनखांवर रंग भरा
८) चल गं सये वारुळाला, वारुळाला, वारुळाला  
नागोबाला पूजायाला, पूजायाला, पूजायाला
९) ताईबाई, ताईबाई गं,
अता होणार लगीन तुमचं!
१०) गोरी गोरीपान, फुलासारखी छान
दादा, मला एक वहिनी आण
११) तव भगिनीचा धावा ऐकुनि धाव घेई गोपाळा
गोपाळा लाज राख नंदलाला
१२) लेक लाडकी या घरची
होणार सून मी त्या घरची
१३) कन्या सासुऱ्यासीं जाये।
मागें परतोनी पाहे ॥ १॥
१४) नववधू प्रिया मी, बावरते
लाजते, पुढे सरते, फिरते
१५) करु देत शृंगार, सख्यांनो करु देत शृंगार
अग्नीवाचून आज करितसे राजपुती जोहार
१६) दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ
छोडमे जी ये गमुस्सा ज़्‍ारा हँस के दिखाओ
 १७) जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है
जिसके वास्ते ये तन है मन है और प्राण है॥
१८) नानी तेरी मोरनी को मोर ले गए
बाकी जो बचा था काले चोर ले गए

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा