रामकथेतील संदर्भ
१) ज्या महर्षीनी जगाला रामायण सांगितले व रामाने सीतेचा त्याग केल्यावर स्वत:च्या देखरेखीखाली कुश आणि लव यांचा सांभाळ केला, त्या आदिकवी वाल्मिकी ऋषींचा आश्रम या नदीच्या तीरावर होता.
२) दशरथाची राजधानी अयोध्या या नदीच्या काठी वसलेली होती.
३) दशरथ राजाने पुत्रकामेष्टी यज्ञासाठी ऋष्यश्रृंग ऋषींना येथून पाचारण केले.
४) विश्वामित्र ऋषींच्या आज्ञेवरून यज्ञयागात विघ्न आणणाऱ्या सुबाहू, त्राटिका यांसारख्या महाभयंकर राक्षसांचा बंदोबस्त करून श्रीराम आणि लक्ष्मण जनकराजाकडे पोहोचले. शिवधनुष्य लीलया वाकवून श्रीरामाने सीता मिळविली ती येथेच.
५) भारद्वाज ऋषींच्या सांगण्यावरून चित्रकूट पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या या नदीच्या काठी श्रीरामांनी वनवासातील काही काळ वास्तव्य केले.
६) गोदावरी नदीच्या किनारी वास्तव्यात असताना सीतेवर हल्ला करणाऱ्या शूर्पणखेला लक्ष्मणाने विरूप केले. खर, दूषण आदी १४ सहस्र राक्षसांचा रामाने वध केला. मारीच राक्षसाच्या मदतीने रावणाने सीतारहण केले ते येथेच.
७) सीतेचा शोध घेत प्रभू श्रीराम दक्षिणेकडे मार्गक्रमण करू लागले. वाटेत या ठिकाणी आश्रमात शबरीने प्रेमाने दिलेली बोरे चाखली. जवळच्याच ऋष्यमूक पर्वतावर हनुमान व कििष्कधापती सुग्रीव यांची रामाबरोबर पहिली भेट झाली. सुग्रीवावर अन्याय करणाऱ्या वालीचा रामाने वध केला.
८) सीतेला पळवून नेल्यावर रावणाने लंकेतील या ठिकाणी बंदिवासात ठेवले होते.
९) श्रीरामांच्या आज्ञेवरून नल नामक वानराने लंकेपर्यंत वानरसन्य नेण्यासाठी सेतू बांधण्याची जबाबदारी पार पाडली. हा सेतू भारतातून येथे सुरू होतो.
१०) राम-रावण युद्धात रणभूमीवर मूíच्छत झालेल्या लक्ष्मणावर संजीवनी दिव्यौषधींचा उपचार करण्यासाठी हा पर्वतच हनुमानाने उचलून आणला.
स्थलदर्शक गट
अ) श्रीलंकेतील अशोकवन.
ब) गंगेची उपनदी तमसा नदी.
क) अंगदेशाची राजधानी चंपा.
ड) हिमालयातील द्रोणागिरी पर्वत.
इ) मिथिला म्हणजेच नेपाळमधील जनकपूर
ई) भारतातील रामेश्वर ते श्रीलंकेतील मानार बेट .
उ) नाशिक येथील पंचवटी.
ऊ) शरयू नदी.
ए) मंदाकिनी नदी
ऐ) कर्नाटक राज्यातील हंपीजवळील पंपा सरोवर.
डोकॅलिटी
बालमित्रांनो, येत्या आठवडय़ात येते आहे रामनवमी. या निमित्ताने आपण रामायण कथेत येणाऱ्या विविध नद्या, स्थाने, पर्वत यांची ओळख करून घेणार आहोत. एका गटात रामकथेतील काही महत्त्वाच्या घटना कुठे घडल्या यांचे संदर्भ दिले आहेत, तर दुसऱ्या गटात त्या स्थळांची नावे दिलेली आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-04-2013 at 12:16 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dokality