साहित्य : ३ जुन्या (खराब) सीडीज्, एका मापाची ५ ते ६ झाकणे, जरीची फुले, टिकल्या, क्रिस्टल, थ्रीडी आऊट लाइनर्स, कात्री, गम (फेव्हीबॉण्ड), डबल साइड जाड टेप  
कृती : सर्व सीडीज् मधोमध (अर्धगोल तयार होतील अशा) आडव्या कापा. अर्धगोलावर मधे व सभोवती जरीची फुले फेव्हीबॉण्डने चिकटवा व क्रिस्टल्स्, टिकल्यांनी सुशोभन करा. थ्रीडी आऊटलायनरने ठिपके जोडा. ते पूर्णपणे वाळू द्या. दरम्यान, एका उंचीच्या बुचांच्या वरील पसरट बाजूस डबल साइडेड टेप जोडून घ्या. वाळलेल्या सर्व सीडीज्साठी पाय तयार होतील. ते एकमेकांना जोडा व नीट वाळू द्या. बाप्पा, गौरींच्या नैवेद्याच्या ताटाभोवतीची रांगोळी झाली तयार, तीही जरा हटके!
प्रसादाचे वाडगे
साहित्य : श्रीखंडाचा गोलाकार (चपटा) डबा किंवा सीडी बॉक्सचे झाकण, चपटी दोरी, अ‍ॅक्रिलिक रंग, ब्रश, कात्ती, गम, क्रिस्टल, इ.
कृती : रिकाम्या डब्याला अथवा झाकणाला बाहेरील बाजूस गम लावून घ्या. त्या गमवर पटापट चपटी दोरी गोलाकारात गुंडाळून ती वाळू द्या. अ‍ॅक्रिलिक रंगाचा बेस द्या. टिकल्या व क्रिस्टल्सच्या सहाय्याने सुशोभित करा. यासाठी तुम्ही सीताफळ, खजुराच्या बिया किंवा पिस्त्याच्या सालांचा देखील वापर करू शकता. अशा रिसायकल वाडग्यात गौरी गणपतीच्या आशीर्वादास येणाऱ्या भाविकांसाठी खिरापत, पेढे, साखरफुटाणे इ. ठेवण्यासाठी उपयोग होतो.
muktakalanubhuti@gmail.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पार्थ पतंगे, ४ थी, साऊथ इंडियन स्कूल, डोंबिवली


मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eco friendly rangoli designs