मुळे रुजतात, माती घट्ट धरून ठेवतात
खोडे वाढतात, लाकूड बनतात
पाने बहरतात, प्राणवायू सोडतात
फुले फुलतात, सुगंध देतात.
फळे पिकतात, आनंद देतात
झाडांचे सगळेच कुटुंबीय
माणसासाठी किती झटतात?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फळे देते फुले देते
पशू पक्ष्यांची माऊली होते
उन्हातान्हात उभे राहून
झाड मानवाला सावली देते.

चिऊताईचे घरटे झाडांच्या फांद्यात
तिच्या पिलाची चिवचिव घुमतेय कानात
तिची पिले राहोत अशीच हसत खेळत
झाडांच्या फांद्या राहोत वाऱ्यावर डोलत.

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Environmental song
Show comments