त्यांनी खास आग्रह केल्याने आणखी काही समुद्र पार करून त्यांच्या गावात मी पोहोचलो. दुपार झालेली. चाळीस दिवस सलग पोहल्याने भूक लागलेली. खाण्याच्या ठिकाणी गेलो. बाहेर कडक ऊन असले तरी त्या ठिकाणी मात्र तिन्हीसांजेचे वातावरण तयार केलेले. तिथे असणाऱ्या सर्वांनीच सूर्याला फसवल्याचे मला अजिबात आवडले नाही. सोनेरी कुंद प्रकाशात वातावरण थंड व शांत होते. ठिकठिकाणी सरबताने भरलेली तर काही अर्धी रिकामी काचेची सुरेख भांडी होती.

पत्रास आणि चित्रास कारण की, माझ्या उजव्या हाताच्या पहिल्या बोटाने त्या वस्तूंना स्पर्श करण्याचा हट्टच धरला आणि सरळ हात सोडून तो त्या वस्तूंच्या कपाटात अळीसारखा शिरला. प्रत्येक चकाकणाऱ्या गुळगुळीत भांड्यावर जणू घसरगुंडी खेळला. जसजसे बोट स्पर्शत गेले, तसतसे माझ्या कानांनी कागदावर बोटांचे स्पर्श उमटवले. त्या स्पर्शात रंग भरले होते. विविध आकार होते. काही जाड तर काही नाजूक आकाराचे होत्याचे कानांना कळले, कानांनी कागदावर उमटवले. काही हातभर उंच तर काही अगदी एक बोट सुबक ठेंगणी भांडी होती. काही भांड्यांना चेहऱ्याचे, माणसाचे, वाद्याचे आकार दिलेले. अशी काचेची भांडी कशी बनवत असतील? क्यूट्यूबवर पाहायला पाहिजे.

Diagnostic accuracy of capsule endoscopy
‘कॅप्सूल एंडोस्कोपी’द्वारे गंभीर आजाराचे अचूक निदान! ७३ वर्षीय वृद्धाचे वाचले प्राण;  जाणून घ्या अत्याधुनिक प्रक्रिया…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
smart wearables loksatta article
कुतूहल: स्मार्ट परिधानीय (स्मार्ट वेअरेबल्स)
article nobel prize winner south korean author han kang
विश्व साहित्याला गवसलेला नवा सूर
Diwali, lamp Diwali, Diwali 2024, Diwali latest news,
दीपज्योतिर्नमोऽस्तुते।
an overview of explainable artificial intelligence
 कुतूहल : पारदर्शी कृत्रिम बुद्धिमत्तेचे उपयोजन
Rumours of bombs due to science experiments police got confuse
विज्ञानाचा प्रयोग, बॉम्बची अफवा अन् पोलिसांची तारांबळ, काय घडले नेमके?
Beauty Influencer Hacks
चेहऱ्यावरील मुरूम दूर करण्यासाठी कच्चा लसूण वापरणे फायदेशीर आहे का? वाचा तज्ज्ञांचे मत

हेही वाचा…बालमैफल : चिन्मयची दुनिया

अशीच सुंदर उघडी वेगळी भांडी मला शाळेच्या प्रयोगशाळेतही दिसलेली. ती सर्वच पारदर्शक होती. त्यांना रंग नव्हते? छ्या! त्यांना बोट लावायलादेखील मुभा नव्हती. असो.

हेही वाचा…बालमैफल: जागते रहो…

स्वयंपाकघरात नसली तरी किचनमध्ये अशी भांडी असतात, पण ती केवळ फुटण्यासाठीच असतात. तुला कशाकशाला स्पर्श करायला आवडतो? मातीच्या भांड्यांना? टूथब्रशच्या केसांना? भिंतीवर वाढलेल्या शेवाळाला? घरघरत्या मिक्सरला? दुकानात उघड्या ठेवलेल्या धान्याला? मला कळव… पण काय, कसे कळवशील? पत्रासोबत माझ्या कानांनी काढलेले चित्र तुला पाठवत आहे. तू तसे कानांनी काढलेल्या स्पर्शाचे चित्र मला पाठव.

तुझा खासमखास मित्र

-श्री बा