अदिती देवधर

गणेश आणि शैलेश बाहेरून आले. खोलीत आजोबा कोणाशी तरी बोलत बसले होते. ‘‘अरे मुलांनो, इकडे या. तुम्हालाच भेटायला आले आहेत सरपंचसाहेब.’’ आजोबांनी हाक मारली.
गणेश आणि शैलेश खोलीत गेले. शाळा कशी चालू आहे, अभ्यास करता ना वगैरे सरपंचांनी चौकशी केली. ‘‘ते ‘गावाकडच्या गोष्टी’ तुम्हीच सुरू केलं आहे ना?’’ सरपंचांनी विचारलं.
‘‘हो. ती वारसा फेरी आहे.’’ शैलेश म्हणाला.
‘‘मागच्या आठवडय़ात एक मोठे पक्षीतज्ज्ञ तुमच्या वारसा फेरीला आले होते. भलतेच खूश झाले. घुबडाचं घरटं असलेली ढोली तुम्ही त्यांना दाखवलीत म्हणे.’’ सरपंच म्हणाले.
‘‘हो. घुबड हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. पुण्याला आमच्या मित्र-मैत्रिणींकडे आम्ही गेलो होतो तेव्हा त्यांच्याशी ओळख झाली.’’ गणेशने सांगितलं.
‘‘तुम्हाला त्या घुबडाचं नाव कसं कळलं? औषधी वनस्पतींचीही तुम्हाला खूप माहिती आहे, असं ते म्हणत होते. ‘गावाकडच्या गोष्टी’ सुरू करायची कोणाची कल्पना?’’ मुलं गांगरलेली बघितल्यावर सरपंचांच्या लक्षात आलं आपण प्रश्नांची फारच सरबत्ती केली.
‘‘त्या पक्षीतज्ज्ञानं कौतुक केलं तेव्हा माझी कॉलर अशी ताठ झाली. आपल्या गावातली मुलं छान उपक्रम करताहेत; पण गावात असून आम्हाला काहीच माहीत नाही हे बरोबर नाही. म्हणून आलो माहिती घ्यायला.’’ त्यांनी सांगितलं. गणेश आणि शैलेशनं आजोबांकडे बघितलं. मुलांची घाबरगुंडी उडालेली बघून ते हसत होते. पण आता मुलांची भीती गेली.
पुण्याला यश-नेहा-संपदा-यतीनच्या वारसा फेरीबद्दल मुलांनी त्यांना सांगितलं. ‘‘आपल्या गावात खूप झाडं-झुडपं-पक्षी-फुलपाखरं आहेत. संगीता, मीना, राजू आणि आम्ही दोघांनी ठरवलं आपणही अशी फेरी सुरू करू.’’ गणेश म्हणाला.
‘‘त्या चौघांनी आम्हाला मदत केली.’’ शैलेश म्हणाला. सरपंच आणि आजोबा कौतुकानं बघत होते.
‘‘गावातल्या सगळय़ांना या फेरीबद्दल माहीत नाही. मग तिकडून शहरातून लोक फेरीला कसे येतात?’’ सरपंचांनी डोळे बारीक करत विचारलं.
‘‘यशच्या दादानं आम्हाला पोस्टर करून दिलं. तो ग्राफिक डिझायनर आहे. व्हॉट्सअॅपवरून बऱ्याच लोकांना त्यानं पाठवलं. ते बघून लोक यायला लागले.’’ गणेश म्हणाला.
‘‘असं होय! तुम्हाला एवढे पक्षी आणि वनस्पती कसे माहीत झाले?’’ सरपंचांनी विचारलं.
यशनं हाच प्रश्न विचारला होता. यश आणि गॅंगला गणेशनं त्यांचं गुपित सांगितलंच होतं.
‘‘आपण अंगणात जाऊ,’’ असं म्हणत तो बाहेर गेला. सरपंच, आजोबा आणि शैलेश त्याच्या मागोमाग गेले. एका झुडपाच्या पानाजवळ गणेशनं फोन धरला आणि गूगल लेन्स सुरू केलं. त्या झाडाचं नाव आलं.
‘‘हे झकास आहे.’’ सरपंच म्हणाले.
‘‘सारखी दिसणारी बरीच पानं असतात. फुलपाखरांत ही साम्यं असणारी आहेत. मीनाचा भाऊ मुंबईला शिकतो. जीवशास्त्रात पदवी घेतोय. त्याला व्हॉट्सअॅपवर फोटो आणि आम्ही शोधलेलं नाव पाठवतो आणि खात्री करून घेतो.’’ गणेश म्हणाला.
‘‘मुलांनो, गावाकडच्या गोष्टी सुरू करून तुम्ही छानच केलंत. तुमचं काय ते पोस्टर आहे ते मलाही पाठवा. ग्रामपंचायतीतल्या सगळय़ांना फेरीला घेऊन येतो,’’ असं म्हणत सरपंच निघाले आणि ‘‘पोरांनो, आणखी एक काम होतं,’’ असं म्हणत थांबले..

Ants the World’s First Farmers?
Ant Farmers: ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी मानवाने नाही तर ‘या’ कीटकाने केली शेतीला सुरुवात; नवीन संशोधन काय सांगते?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Abhijeet Sawant
“लाखो-हजारात माझी ताई तू…”, भावा-बहिणीच्या नात्यावर अभिजीत सावंतचे मंत्रमुग्ध करणारे गाणे
Everything is for father cute little girl rolls chapati with sweet hands Video Viral
“सगळं काही बाबांसाठीं”, इवल्या इवल्या हातांनी लाडक्या लेकीने लाटली चपाती, गोंडस चिमुकलीचा Video Viral
Old couple Viral Video
खऱ्या प्रेमाला वयाचं बंधन नसतं… आजी-आजोबांचा तो सुंदर VIDEO पाहून कराल कौतुक
Snehal Tarde
“तिथल्या स्वयंपाकघराचा वास….”, स्नेहल तरडे यांनी सांगितले की, शहरातल्या घरात चूल का तयार केली?
tiger upset with tourists in tadoba andhari tiger project
Video : ताडोबातील वाघ म्हणतो, ‘बस आता..! मला तुमचा कंटाळा आलाय’
A firecracker burst behind the old father
‘अरे, तो बाप आहे ना तुझा…’ वृद्ध वडिलांच्या मागे फोडला फटाका; VIDEO पाहून नेटकरी संतापले

aditideodhar2017@gmail.com