साहित्य- प्लॅस्टिकचा कंगवा/पट्टी/फुगा, पाण्याने भरलेली प्लॅस्टिकची बाटली (अर्धा ते १ लिटरची), लोकर किंवा लोकरीचा कपडा, सुई/टाचणी
कृती- पाण्याने भरलेल्या बाटलीच्या तळाजवळ टाचणीच्या सहाय्याने एक बारीक भोक पाडा. बाटलीतून पाण्याची धार पडायला सुरुवात होईल. आता प्लॅस्टिकची पट्टी लोकरीवर थोडीशी घासा. नंतर पट्टी पाण्याच्या धारेजवळ न्या. पाण्याची धार आपली दिशा बदलेल आणि ती धार पट्टीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही पट्टी पाण्याच्या धारेपासून लांब नेल्यावर धार पुन्हा पूर्ववत होईल.
असाच प्रयोग बाटलीच्या ऐवजी फुगा घेऊनही करून बघू शकता. फुगवलेला फुगा लोकरीच्या कपडय़ावर घासून तो नळातून किंवा बाटलीतून पडणाऱ्या बारीक धारेजवळ आणल्यास धार आपली दिशा बदलून वक्र होते असे तुम्हाला दिसेल.
असे का होते?
जेव्हा तुम्ही पट्टी लोकरीवर घासता तेव्हा लोकरीवरील अणूचे सूक्ष्म कण म्हणजेच इलेक्ट्रॉन्स पट्टीवर जमा होतात. हे इलेक्ट्रॉन्स ऋणभारित (निगेटिव्ह चाज्र्ड) असतात. म्हणजेच ऋणभारित पट्टी आता धनभारित (पॉझिटिव्ह चाज्र्ड) गोष्टींना आकर्षित करेल. पाण्याच्या रेणूंत हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे अणू असतात हे तुम्हाला माहीतच आहे. त्यातील अणुकेंद्रकांमध्ये प्रोटॉन हे धनभारित कण असतात. ऋणभारित पट्टी पाण्याच्या धारेजवळ नेल्यावर त्यांच्यात आकर्षण निर्माण होते. ही जादू स्थितिक विद्युत बलाची आहे.
स्थितिक विद्युत संबंधीचे प्रयोग तुम्हाला यूटय़ूबवर पहायला मिळतील. सोबत त्यांच्या लिंक दिलेल्या आहेत. त्या तुम्हाला आवडतील अशी खात्री आहे.
पाण्याच्या धारेचा प्रयोग-

प्लॅस्टिकच्या स्ट्रॉ वापरून केलेला प्रयोग https://www.youtube.com/watch?v=gko1dU6bmrw येथेही पाहू शकता.

मनाली रानडे-  manaliranade84@gmail.com

Story img Loader