बालमित्रांनो, आज आपण ‘क्त’ या जोडाक्षराचा आपल्या खेळात उपयोग करणार आहोत. येथे शब्दातील ‘क्त’ या अक्षराचे स्थान दर्शविले आहे. शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी आवश्यकतेनुसार ‘क्त’ या अक्षराला काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार इत्यादी तुम्ही देऊ शकता. अशाप्रकारे तुम्ही खालील सूचक अर्थावरून ‘क्त’ युक्त शब्द ओळखायचे आहेत.
१. भजन-पूजन करणारा
२. कोष्टक
३. जुलूम
४. चिंधी, फाटके वस्त्र
५. लोभ, हव्यास
६. मोती
७. वाक्पटुता, भाषण करण्याची कला
८. यथेच्छ, भरपूर
९. खासगी
१०. नवऱ्याने टाकून दिलेली स्त्री
११. ठेकेदार, कंत्राटदार
१२. लाकडी फळ्यांचे छत, पटई
१३. सिंहासनारूढ, गादीवर बसलेला राजा
१४. विधिपूर्वक अभिषेक न झालेला
१५. भेदभाव, पक्षपात
१६. रक्तामधील आढळणाऱ्या लाल अगर पांढऱ्या रक्तपेशींचे प्रमाण. हे मोजण्यासाठी हिमोसायटोमीटर उपकरण वापरले जाते.
१७. निशाचर, राक्षस, श्रीरामरक्षा स्तोत्रात या शब्दाचा उल्लेख आहे.
१८. ज्याने एखाद्या गोष्टीवर पाणी सोडले आहे. नाव टाकले आहे.
उत्तरे –