तव्यावर पडला की चर्र आवाज
पानावर पडला की दव हा साज
शिंपल्यात पडला की मोती हे रूप
संगतीचा असर माझ्यावर होतो खूप
जरी पृथ्वीवरील ७०% भाग आहे माझा
तरी सावध ऐका पुढल्या हाका,
आणि मला जरा जपूनच वापरा
पाणी
हिरव्या करडय़ा रंगाचे
गोल गोल माझे रूप
आत गर आणि बिया
पण कवच मात्र कठीण खूप
चटणी, बर्फी, मुरंबा बनवा झडकरी
अनेक रोगांवर मी गुणकारी
कवठ
कर्कश्श ओरडून सावध करत असते मी मानवजातीला
ओळखून वातावरणातील प्राणवायूचा स्तर
तेव्हा पक्ष्यांची भाषा समजावून घ्या जरा
पर्यावरणाचे रक्षण करण्यास मदत करा
पिवळी चोच माझी, पिवळेच पाय
झाडं लावा नाहीतर मी जगणार नाही
साळुंकी