प्राची मोकाशी

शनिवारची ‘फ्रेश’ सकाळ. साधारण आठची वेळ. स्थळ शाळेजवळची ‘बिरोबाची टेकडी’. टेकडीवर असलेल्या बिरोबा देवाच्या मंदिरामुळेच तिचं हे नाव पडलं होतं. दररोज येणाऱ्या मॉर्निग वॉकर्स, जॉगर्स, सायकलस्वारांबरोबरच आज सकाळी तिथं विशेष गर्दी जमली होती ‘निळय़ा युनिफॉम्र्सची.’ एका शाळेच्या जवळपास २००-२५० सीनियर के. जी. च्या मुलांची. पाच-सहा वर्षांची ही सगळी पिल्लावळ अगदी उत्साहात इकडे-तिकडे बागडत होती. त्यांचे बाबा मंडळी त्यांना आवरण्याचा प्रयत्न करत होते. आश्चर्य म्हणजे आज कुणा विद्यार्थ्यांच्या आया दिसत नव्हत्या. कारण शाळेचा उपक्रमच मुळी तसा होता-  फादर-चाईल्ड ट्रेक.

municipal administration launched Kacharamukt Tas campaign
कचरामुक्त तास मोहिमेतून ६४ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन, १ हजार ४३९ कामगार, कर्मचाऱ्यांची कामगिरी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Garbage collection, pune , Garbage collection night ,
पुणे शहरात आता रात्रीही होणार कचरासंकलन, हे आहे कारण ?
Gang involved in gold chain and vehicle theft arrested
सोनसाखळी, वाहनचोरी करणारी टोळी उघडकीस; सराईत अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात
500 kg of banned plastic bags seized
कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ५०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त
plastic banned
खबरदार प्लास्टिकचा वापर कराल तर… कर्जत नगरपंचायतची धाडसी कारवाई…
Aatkoli dumping ground Thane corporation FIR registered
ठाणे पालिकेच्या आतकोली कचराभुमीवर दगडांसह पाण्याची चोरी, पालिका प्रशासनाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Kalyan Dombivli Municipality on complaint of non collection of garbage
कल्याणमधील कचरा संकलनात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदाराचा ठेका रद्द, पालिकेकडून होणार ब, ड आणि जे प्रभागात सफाई

कोरडा कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करत ‘हसत खेळत टेकडी स्वच्छता’ करण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता. त्यासाठी शाळेनं सगळय़ांना एक प्लास्टिकची पिशवी घरून आणायला सांगितली होती. टेकडीच्या पायथ्यापासून ते बिरोबा देवळापर्यंतच्या या ट्रेकमध्ये मिळणारा कचरा टेकडी चढत-चढत पिशवीमध्ये गोळा करायचा होता. त्याचबरोबर आपापल्या घरातून वेगळं आणलेलं बाटलीभर पाणी वाटेत लागणाऱ्या टेकडीवरच्या झाडांना घालायचं होतं.

‘‘हाय, अर्णव.’’ कीयांशने अर्णवच्या पाठीवर थाप मारली. दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली.

‘‘अरे, हे दोघे कालच शाळेत भेटले होते ना?’’ कीयांशचे बाबा अर्णवच्या बाबांना म्हणाले.

‘‘हो का? मला अर्णवचे सगळे मित्र अजून माहिती नाहीयेत. मी परवाच आलोय घरी.’’

‘‘अरे हो, तुम्ही मर्चंट नेव्हीमध्ये असता ना?’’

‘‘हो. वर्षांतले सहा महिने बाहेर असतो मी. या वेळी तर आठ महिने बाहेर होतो. आल्या आल्या या फादर-चाइल्ड ट्रेकच्या निमित्तानं अर्णवच्या मित्रांशी आणि त्यांच्या पालकांशी ओळख होईल. छान आयडिया आहे शाळेची.’’ अर्णवचे बाबा आणि कीयांशचे बाबा एकमेकांना शेक-हँड करत म्हणाले.

सगळे पालक-विद्यार्थी जमल्यावर ट्रेकला सुरुवात झाली. टेकडीवर सगळय़ा वर्गाच्या शिक्षिकाही तयार उभ्या होत्या. एरवी साडी किंवा सलवार-कुर्तामध्ये दिसणाऱ्या शिक्षिका आज पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट आणि निळय़ा ट्रॅक-पॅंट घालून होत्या. शाळेनं स्पॉन्सर केलेल्या त्यांच्या टी-शर्टवर पृथ्वीचं चित्र होतं ज्यंवर लिहिलं होतं, ‘‘जपू या आपली सुंदर धरा, मिळून करू या प्लास्टिकचा निचरा..’’ चिल्ल्यापिल्ल्यांना जरी त्यातलं फारसं समजत नसलं तरी बाबामंडळी या उपक्रमाचं भरभरून कौतुक करत होते. ट्रेकवर पुढे-पुढे जाताना मुलांना नवनवीन गोष्टीही पाहायला मिळत होत्या.

‘‘हे काय आहे?’’ कीयांशनं एका मोठय़ा झाडाच्या मुळांलगत बनलेल्या मातीच्या डोंगराकडे बोट दाखवत विचारलं.

‘‘मुंग्यांचं वालूळ.’’ अर्णव लगेच म्हणाला. त्याचा ‘र’ अक्षराचा उच्चार अजून स्पष्ट नव्हता.

‘‘म्हणजे?’’ कीयांशला समजेना.

‘‘म्हणजे मुंग्यांचं घर. वा-रू-ळ.’’ अर्णवचे बाबा म्हणाले.

‘‘वॉव! अर्णवला बरीच माहिती आहे.’’ इति कीयांशचे बाबा.

‘‘तो येत असतो नेहमी टेकडीवर आईसोबत.’’

‘‘एरवी हे मुंग्यांचं वारूळ वगैरे मुलांना कुठे रोज बघायला मिळतं?’’ कीयांशच्या बाबांनी लगेच त्या वारुळाचा मोबाइलवर फोटो घेतला. फोटोला ‘अ‍ॅट-हिल ऑन ट्रेक’ असं कॅप्श्न देत तो फॉरवर्डही केला.

इतक्यात अर्णव आणि कीयांश बाबांचा हात सोडून कुठलातरी वर्गमित्र दिसला म्हणून त्याच्यामागे धावत सुटले आणि पुढे दिसेनासे झाले. इथे दोघा बाबांचं त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत धाबं दणाणलं. हात सोडून धावत गेल्याबद्दल ते दोघांना फैलावर घेणार होते, पण मुलांनी हातांच्या ओंजळीमध्ये गोळा केलेली नाजूकशी गुलाबी फुलं पाहून ते नुसतेच हसले.

‘‘आईसाठी.’’ अर्णव प्रेमानं म्हणाला.

‘‘पण फुलं तोडू नयेत, पिल्ल्या.’’ बाबांची सूचना.

‘‘तोडली नाहीत. खाली पडलेली उचलली.’’ कीयांशचं ताबडतोब स्पष्टीकरण.

‘‘मस्त आहेत. आई खूश होईल.’’ अर्णवच्या बाबांनी फुलं त्यांच्या स्लिंग-बॅगमध्ये अलगदपणे ठेवली.

‘‘आम्ही कचरापण जमा केलाय.’’ कीयांश म्हणाला. खरोखरच तिथल्या झुडपांच्या शेजारी बराच कचरा होता. दोघा मुलांनी मिळून लोकांनी टाकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, कोल्ड्रिंकचे कॅन्स, मिनरल वॉटरच्या बाटल्या गोळा करून ठेवल्या होत्या. मग काय, दोन्ही बाबांनी तो कचरा आपापल्या पिशव्यांमध्ये भरला. 

हसत-खेळत बिरोबा मंदिराजवळ पोहोचेपर्यंत बऱ्याचशा मुलांच्या पिशव्या कचऱ्यानं पूर्णपणे भरल्या होत्या. वाटेत झाडा-झुडपांना पाणी घातल्यामुळे पाणीही संपलं होतं. दमलेली ही गँग जेव्हा मंदिराजवळ पोहोचली तेव्हा शाळेच्या मुख्याध्यापिका मोठय़ा हिरव्या ‘ईको-फ्रें डली’ बॅग्ज घेऊन जातीने तिथे उभ्या होत्या. मुलांनी त्यांच्याकडला कचरा त्या बॅग्समध्ये भरला. हा सगळा कचरा एका मिनी-व्हेनमधून ‘री-सायकल’ करण्यासाठी नेला गेला. मुख्याध्यापिकांनी मुलांचं कौतुक करत सगळय़ांचे आभार मानले. जॅम-सॅंडविच आणि फ्रुटीच्या ‘सरप्राइज ट्रीट’ने ट्रेकची सांगता झाली.

साधारण पंधरा दिवसांनी..

‘‘आत येऊ का मॅडम ?’’ अर्णवचे बाबा मुख्याध्यापिका मॅडमच्या केबिनच्या दारापाशी उभे होते. त्यांनी बाबांना बसायला सांगितलं.

‘‘पॅरेंट्स मीटिंग झाली?’’

‘‘होय, मॅडम.’’

‘‘बोला, काही विशेष?’’

‘‘विशेषच. तुमची ‘फादर-चाईल्ड ट्रेक’. एक म्हणजे वडील आणि मुलांमधलं ‘बॉन्डिंग’ वाढवण्यासाठीही खरोखरच एक छान ‘अ‍ॅक्टिव्हिटी’ होती. आणि दुसरं म्हणजे या ट्रेकनं आमच्या अर्णववर खोलवर परिणाम केलाय.’’

‘‘तो कसा?’’

‘‘आम्ही नेहमीच बिरोबा टेकडीवर जात असतो. पण या ट्रेकनंतर, गेल्या आठवडय़ात जेव्हा आम्ही तिथे पुन्हा गेलो, तेव्हा अर्णवचं खेळण्याकडे फारसं लक्षच नव्हतं. त्याला दिसत होता कचरा, फेकलेल्या बाटल्या, पिशव्या.. त्यानं तिथं पुन्हा कचरा गोळा करायला सुरुवात केली. तो कचरा आम्ही टेकडीच्या पायथ्याशी ठेवलेल्या कचरापेटीत नेऊन टाकला.’’

‘‘अरे वा! आज एका मुलावर आमच्या उपक्रमाचा परिणाम झालाय, उद्या अजून काही मुलांवर होईल. हाच तर याचा उद्देश आहे. सुरुवात कुठेतरी व्हायला हवी. ‘Charity begins at home’ हे यापेक्षा वेगळं काय असतं?’’

‘‘खरंय मॅडम. तुमच्या उपक्रमाला अजून एक ‘फीडबॅक’ द्यायचा होता.’’

बाबांनी अर्णवनं काढलेल्या चित्राचा कागद मॅडमपुढे ठेवला. त्यांवर त्यानं दोन मोठे गोल रेखाटले होते. एका गोलावर त्यानं प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, कॅन्स वगैरे काढले होते. त्याखाली त्याने लिहिलं होतं ‘Sad earth.’ दुसऱ्या गोलावर त्याने झाडं, फुलं, पक्षी रंगवले होते. तिथे त्याने लिहिलं होतं Happy earth.’

मॅडमच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. यापेक्षा बोलका ‘फीडबॅक’ त्यांच्यासाठी दुसरा काय असणार होता?

mokashiprachi@gmail.com

Story img Loader