साहित्य :  कार्डपेपर, कात्री, गम, पेन्सिल, फुटपट्टी, सॅटिनची रिबीन, पंच मशीन इ.
कृती : छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे (कुठल्याही आवडीच्या रंगात) चौकोनी आकाराचा पाया ठेवून आकृती काढून घ्या. आकृती बाहेरील बाजूने कापा. त्रिकोणाच्या मार्जिन्स आतल्या बाजूस दुमडा. चारही बाजूंना विरुद्ध रंगाच्या पट्टय़ांनी सुशोभन करा. चौकोनाच्या चारही बाजू त्रिकोणाचा पाया आहेत. त्या वरील बाजूस दुमडा. एक पिरॅमिड तयार होईल. या अनाराच्या आकाराला प्रत्येक त्रिकोणाला पंच मशीनने छिद्र पाडून त्यात विरुद्ध रंगाची सॅटिनची रिबीन ओवा व सुंदरसा बो बांधून सर्व सांधे जोडा. चॉकलेट्स वा छोटीशी वस्तू देण्यासाठी असा गिफ्ट बॉक्स तयार करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा