द्राक्षांच्या मळ्यात
कोल्होबा शिरला,
लोंबते घड पाहून
पाणी सुटलं तोंडाला.
उंच उडी मारून
साध्य काही होईना
द्राक्षाचा घड मुळी
हाती लागेना.
प्रयत्नांची शिकस्त करून
पार थकून गेला,
अपयश आल्यामुळे
निराशेन घेरला.
द्राक्षं चाखण्याची
उमेद संपली
उपाशी राहण्याची
आली पाळी.
वैतागून कोल्होबा
स्वत:शीच म्हणाला,
‘‘व्यर्थ खटपट
करा कशाला?
चवीला ही द्राक्षं
नक्की आंबट असतील
खाल्ल्यावर थुंकून
टाकावी लागतील.
आंबट द्राक्षं खाण्यानं
होतील पोटाचे विकार
त्यापेक्षा शोधावी
हक्काची शिकार’’
वेलीवर बसलेली चिमणी
हसत म्हणाली,
न चाखलेली द्राक्षं
कोल्होबाला आंबट लागली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा