साहित्य : सुपारीच्या वारीचे  गोल, आयताकृती झाकणं किंवा जुना लांबट ट्रे, लोकर, बटणं, अ‍ॅक्रिलिक रंग, जुन्या वह्यांचे कागद, स्टेपलर, सॅटिनची रिबीन, बटन, सेलोटेप, गम, कात्री, पेन्सिल, ब्रश इ.
कृती : आयताकृती झाकणं व गोल झाकण एकमेकांना खालून व वरून सेलोटेपने चिकटवा. गोलाकार झाकण उलटय़ा फुगीर बाजूने लावायचे आहे. ते आधी गुलाबी अ‍ॅक्रिलिक रंगात रंगवून वाळू द्या.
पेन्सिलने नाक, डोळे काढा व स्केचपेनने रंगवा. ओठांच्या ठिकाणी लाल बटन चिकटवा. लोकरीची लांब वेणी दोन रंगात बनवा. साधरण पूर्ण उंचीचे दुप्पट माप घेऊन करा. ही वेणी चेहरा व अंगाच्या (बाजूंना) कडांना गमच्या साहाय्याने चिकटवा. आत्ताच रिकाम्या केलेल्या दप्तरातील जुन्या वह्यांची कोरी पाने आकारात कापून घ्या. त्याची जाड (वळकटी) थप्पी या उभट ट्रेमध्ये स्टेपलरने जोडा. या रिसायकल नोंदवहीमध्ये महत्त्वाचे सुट्टीचे कार्यक्रम, भेटणारे नवे-जुने नातलग, मित्र-मैत्रिणींचे दूरध्वनी, पत्ते तत्सम मजकूर लिहिण्यास अतिशय उपयोगी होणारच!    

Story img Loader