साहित्य : जुन्या सीडीज्, रंगीत जीग, गम, कात्री, मिठाईचा चपटा बॉक्स, पट्टी, पेन्सिल इ.
कृती : मिठाईच्या डब्याच्या झाकणाला मधोमध पट्टीच्या सहाय्याने पुसटसा छोटा आयत आखून घ्या व झाकण उघडून उलटय़ा बाजूने कापा. ही खिडकी टिश्यूज् ओढून काढण्यास उपयोगी आहे. जुन्या सीडीला कात्रीने असमान तुकडय़ांमध्ये कापा. हे तुकडे डब्याला पाडलेल्या खिडकीच्या आजूबाजूला मोझ्ॉक टाइल्सप्रमाणे गमने चिकटवा. सर्व तुकडय़ांच्या मधल्या जागेत गम पसरवा व त्यावर जीग पसरून तो वाळू द्या. त्यानंतर जास्तीची न चिकटलेली जीग डबा उलटा करून झाडून घ्या. झाला आपला चमचमता टिश्यू बॉक्स तयार!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in