बाळूच्या घरात
उंदराचं बीळ
बिळाच्या तोंडाशी
सांडले तीळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उंदीरमामींनी
केले ते गोळा
उंदीरमामांनी
गूळ आणला
गुळाची पोळी
खमंग केली
तिळाची वडी
गोड झाली

बिळात शिरला
मनीचा पंजा
मामांनी दिला
‘तीळगूळ’ ताजा