साहित्य : गडद निळा, पिवळा रंगीत कार्ड पेपर, छोटा (बसका) आइस्क्रीमचा कप, क्रेप पेपर (हिरवा), केशरी कार्ड पेपर, क्रेयॉन्स, कात्री, गम इ.
कृती : आकृतीत दाखविल्याप्रमाणे गडद निळ्या कार्ड पेपरचा पक्षी बनवून घ्या. पक्षाची चोच बनविण्यासाठी 7 a व 7 b   प्रमाणे व्हॅलीफोल्ड करावा लागेल. आइस्क्रीमच्या कपाला केशरी रंगाच्या पट्टीवर साधारण चॉकलेटी व काळ्या रंगाचे शेडिंग करून टोपलीच्या विणकामासारखे रंगकाम करा आणि ती पट्टी कपाच्या सभोवार लपेटून  स्टेपल करून घ्या. या घरटय़ाच्या पट्टीला अध्र्यावर कातरून मोठ्ठी गुंडाळी गमच्या साहाय्याने (गुंडाळून) चिकटवा.  कागदाचे बोळे करून कपाच्या आत घाला व वरचा भाग क्रेपच्या तुकडय़ांनी भरून टाका. कातरलेल्या पट्टय़ा (खालच्या बाजूस) बाहेरून दुमडत घ्या. हे गवतासारखे दिसेल. या घरटय़ात पक्षाला बसवा. त्याचे पंख व शेपटी पिवळ्या कार्ड पेपरने बनवा. रंगवून घ्या. डोळ्यांच्या ठिकाणी टिकली चिकटवा.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make a paper bird
Show comments