अदिती देवधर

आपली चौकडी नदी स्वच्छता कार्यक्रमाला गेली होती. केवढा आणि किती प्रकारचा कचरा तेथे होता. यांचा गट स्वच्छता करत असतानाही पुलावरून लोक कचरा टाकत होते. ‘जो कचरा आत्ता नदीपात्रात आहे तो साफ केलाच पाहिजे, पण कचरा तेथे येऊच नये म्हणून काही करता येईल का?’ यशच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं. चौघे चर्चा करू लागले.

abhyanagsnan on narak Chaturdashi
बालमैफल: अभ्यंगस्नान
बालमैफल: मुरीकाबुशी
बालमैफल: मुरीकाबुशी
balmaifal story about profit and loss
बालमैफल: नफा तोटा
loksatta balmaifal article
सुखाचे हॅशटॅग: सावकाश, पण हमखास!
interesting story for children in marathi
बालमैफल: कंटाळलेला कावळा
Article about Importance of drawing and painting in child development
चित्रास कारण की: रंगबिरंगी
lokrang balmaifal article
बालमैफल: ‘नाचाओधासां’ मुलांनो…
loksatta balmaifal Ganapati festival holiday school
सुखाचे हॅशटॅग : तुच तुझा सुखकर्ता
Loksatta balmaifal Prize among contestants in the state in essay competition on scientific subject by Vigyan Sabha
बालमैफल : वर्षाचं बक्षीस

‘‘तिथे बराच असा कचरा होता, जो टाळता येणं सहज शक्य आहे.’’ संपदा म्हणाली.

‘‘कचरा टाकणाऱ्यांना दंड करायचा ना?’’ यश म्हणाला.

‘‘लोक कचरा तिथं टाकतातच का? शहराच्या कचरा संकलन यंत्रणेला का देत नाहीत, ते शोधायचं?’’ यतीनला प्रश्न पडले.

‘‘ते केलंच पाहिजे. पण मला म्हणायचं आहे की, बऱ्याच अशा गोष्टी पडलेल्या होत्या, ज्या आपण वापरल्या नाहीत तर कचरा म्हणून तेथे येणारच नाहीत. एकूण कचराच कमी कसा निर्माण होईल याचा विचार करायचा का?’’ संपदानं सुचवलं.

त्यावर यश म्हणाला, ‘‘म्हणजे कागदी किंवा प्लॅस्टिकचे कप, ताटल्या, चमचे वापरायचे नाहीत. एकदा वापरून आपण टाकतो- ज्याला इंग्लिशमध्ये डिस्पोजेबल म्हणतो ते.’’

‘‘बरोब्बर. कचऱ्यामध्ये त्याचं प्रमाण खूप असतं.’’ यतीननं दुजोरा दिला.

‘‘आपण तर घरी कधी हे वापरत नाही. गरज पडली तर एकमेकांकडून जास्तीची भांडी आणतो.’’ नेहा म्हणाली.

‘‘हो, पण तेवढं पुरेसं नाही. जास्तीत जास्त लोक हे कसं करतील?’’ यशचा प्रश्न.

‘‘मागे व्हॉट्सअ‍ॅपवर आईनं एक पोस्ट वाचून दाखवली होती. एका सोसायटीमध्ये त्यांनी भांडय़ांचं भांडार केलं आहे. पन्नास ताटं, पन्नास पाण्याची भांडी, शंभर वाटय़ा, चमचे असं सोसायटीनं विकत घेतले आहेत. ते सोसायटीच्या कार्यालयात असतं. ज्या सदस्यांना गरज असते ते तेव्हा तेथून नेतात. घरचा कार्यक्रम झाला की परत करतात.’’ नेहानं सांगितलं.

‘‘भारी!! आपल्या सोसायटीत शंभर कुटुंबं आहेत. आपण अशी योजना केली तर एवढय़ा घरांमध्ये कार्यक्रमासाठी डिस्पोजेबल ताटं-वाटय़ा-भांडी-चमचे आणले जातात ते टळेल.’’ संपदा आपल्या हाती काही तरी वेगळं गवसल्यासारखं वाटलं.

‘‘कचरा कमी होईल.’’ यश त्वरेनं म्हणाला.

चौकडी लागली कामाला. तसा या कल्पनेला विरोध कोणाचाच नव्हता. पण या वर्षीचं खर्चाचं अंदाजपत्रक, त्याचा ताळमेळ असं करत कल्पना प्रत्यक्षात यायला सहा महिने लागतील असे सोसायटीच्या कार्यकारी मंडळानं चर्चेनंतर कळवलं.

हरकत नाही. सहा महिन्यांनंतर त्यांच्या सोसायटीमध्ये निर्माण होणारा कचरा नक्कीच कमी झालेला असेल.

मग काय? तुम्हाला ही कल्पना आवडली असेल तर तुमच्याही सोसायटीत, इमारतीत अमलात आणायला काय हरकत आहे? काय?aditideodhar2017@gmail.com