विद्या डेंगळे

गुब्ब्या गुबगुबीत होता म्हणूनच बहुतेक त्याचं नाव गुब्ब्या पडलं. त्याचा रंग पांढरा, पण शेपटी काळी. गुब्ब्या काही कोणाच्या घरातलं लाडकं मांजर नाही. तो भटक्याच! गुब्ब्याची एक मैत्रीणही आहे- मनी. तशी ती त्याला जरा वचकूनच असते. गुब्ब्या मारामाऱ्या करण्यात मोठा तरबेज, हे त्याच्या तोंडावरच्या जखमांच्या व्रणांवरून लक्षात येतं. मनी मात्र नाजूकच. गुब्ब्या तिचा परम मित्र होता. मनीलाही एक मैत्रीणही होती, ती म्हणजे खार. मनी झाडावर चढून खारीची झाडावर चढण्याची चपळाई कौतुकाने बघत बसायची. ‘‘खार सतत का पळते बरं?’’ तिला नेहमीच याचं आश्चर्य वाटतं.
एकदा झाडावर बसून खारीच्या चपळाईचं कौतुक करत मनी बसली असता, तिला समोरून गुब्ब्या पळत येताना दिसला. गुब्ब्या एवढा का पळतोय ते बघायला मनी झाडावरून खाली धावत आली. मनी का खाली उतरली ते बघायला खारही सुळकन् झाडावरून खाली उतरली.

leopard cub , leopard , Katol taluka,
VIDEO : दुरावलेल्या आई-पिल्लाची २४ तासानंतर भेट
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
buldhana after multiple checks woman had baby in her womb and another in baby s stomach
धक्कादायक! गर्भवतीच्या पोटात बाळ आणि… बाळाच्या पोटातही ‘बाळ ‘!! अतिदुर्मिळ प्रकार
Udayanraje bhosle
“झुकेगा नहीं….”, माधुरी पवार उदयनराजे भोसले यांच्याविषयी बोलताना म्हणाली, “त्यांनी माझ्यासाठी…”
जगणं आकलनाच्या दिशेनं…
Two leopards at transit treatment center found to be infected with Avian Influenza H5N1 virus
वाघांपाठोपाठ बिबट्यानाही “बर्ड फ्ल्यू”, प्राणिसंग्रहालय, बचाव केंद्रांना सतर्कतेचा इशारा
Little one's Hilarious video
Video : याला भीती वाटत नाही का? चिमुकल्याने हातात पकडली पाल अन् हसत हसत आईकडे धावला…; पाहा मजेशीर व्हायरल व्हिडीओ
cat attack on the bird
‘तो मृत्यूच्या दारातून परत आला…’ मांजरीने केला पक्ष्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; VIDEO पाहून अंगावर येईल काटा

तिघेही झाडाखाली जमले.
‘‘काय रे गुब्ब्या, एवढा पळत का आलास? घाबरलास की काय?’’ मनीनं गुब्ब्याला विचारलं.
गुब्ब्या उत्तर न देता नुसता धापा टाकत राहिला.
‘‘त्या घरात माशाचा वास येत होता म्हणून न राहून मी डोकावलो. आधी खिडकीत बसून अंदाज घेतला. ओटय़ावर मासे दिसले आणि तोंडातून म्याऊ बाहेर पडलंच. त्याबरोबर तो भयंकर ब्रॅन्डो धाडकन् मी बसलेल्या खिडकीवर येऊन उभा ठाकला. मी मागच्या मागेच पडणार होतो, पण पटकन धूम ठोकली. बापरे, केवढा तो कुत्रा!’’ गुब्ब्या सांगू लागला.
‘‘बरं झालं, सुटलास तू! माझी शेपटी त्या रस्त्यावरच्या कुत्र्यांमुळेच तर तुटली. रस्त्यावरचे कुत्रे म्हणजे महाभयंकरच!’’ मनी म्हणाली.
‘‘अगंबाई खरंच की! माझ्या नाही बाई कधी लक्षात आलं तुला शेपटी नाही ते! वाईटच ते कुत्रे!’’ खार तिची झुपकेदार शेपटी नाचवत म्हणाली.
‘‘चल, आपण पुन्हा जाऊन बघू ओटय़ावर मासे आहेत का.’’ मनी म्हणाली.
‘‘मीपण येऊ का तुमच्याबरोबर? मासे नकोत मला, पण मला आवडतं त्या आजीच्या घरात जायला. एकदा मी जाऊन आले आणि आजीनं पाहिल्यावर टीव्हीच्या टेबलामागे जाऊन लपले. आजीला मी उंदीर वाटले. आजीनं काठी आणली तशी मी धूम ठोकली. मी घाबरून खूप आरडाओरडा केला. सगळय़ा खोल्यांतून पळाले, पण आजीच्या काठीला लागले नाही. आजीला दिसलेही नाही.’’ खार सांगू लागली.
‘‘तो ब्रॅन्डो का कोण तो नव्हता का?’’ मनीनं विचारलं.

‘‘त्याला गाडीतून जाताना पाहिलं म्हणून तर घुसले घरात. सबंध रात्र तिथेच काढली एका पडद्यामागे लपून. पण टीव्ही मात्र पाहू शकले. खूप मज्जा आली. दुसऱ्या दिवशी दार उघडल्यावर ब्रॅन्डो दिसायच्या आत तिथून पळ काढला.’’ खार म्हणाली.
तिघांनीही वेगवेगळय़ा वाटांनी आजीच्या घरात जायचं ठरवलं. खारीनं आजीच्या घराच्या मागच्या दारातून शिरायचं ठरवलं.
मनी आणि गुब्ब्या म्हणाले, ‘‘आम्हाला खिडकीतून घुसायची सवय आहे. तो रस्ता आमच्या पायाखालचा आहे.’’ पण ब्रॅन्डो घरात आहे का नाही हे कसं कळणार, असा प्रश्न तिघांनाही पडला. मनी म्हणाली. ‘‘पण मी त्याला आत्ताच रुबाबात गाडीतून जाताना पाहिलंय.’’
‘‘मी आधी आत जाऊन बघते. खार अभिमानानं तिची झुपकेदार शेपटी वर करून लगेच पटकन् मागच्या दारानं आत शिरली आणि कपाटामागे लपली. स्वयंपाकघराच्या खिडकीतून मनी आणि गुब्ब्या घरात शिरले. ओटय़ावर त्यांच्यासाठी जणू मेजवानीच ठेवली होती. एका ताटात भरपूर मासे स्वच्छ धुऊन ठेवले होते. मासे त्यांच्याचकडे एका डोळय़ानं पाहत होते. गुब्ब्या आणि मनीचे डोळे एवढे मासे बघून विस्फारले. मनीनं ताटातला मासा उचलला. ते दोघेही मासे खाण्यात दंग झाले होते. एवढय़ात त्यांना एक चार मिशा असलेली कधीही न पाहिलेली वस्तू घरभर फिरताना दिसली. ती टेबलाखाली गेली, सोफ्याखाली गेली. खुच्र्याखालूनही फिरली. मासा तिथेच सोडून गुब्ब्या त्या घरभर फिरणाऱ्या तबकडीचा पाठलाग करू लागला. त्याच्यापाठोपाठ मनीही गेली. ते पाहून खारीचं कुतूहल जागृत झालं आणि तीही कपाटामागून बाहेर आली. खार पटकन् न घाबरता त्या फिरत्या तबकडीवर जाऊन बसली आणि त्यावर बसून मजेत घरभर फिरू लागली. बैठकीच्या खोलीत तबकडी खुर्चीला आपटून थांबून वळली आणि खारीनं तिथल्या झोपाळय़ावर उडी मारली. तिच्यापाठोपाठ गुब्ब्या आणि मनीही झोपळय़ावर चढले.

कारकुर करत झोपाळा झोके घेऊ लागला आणि मनी आणि गुब्ब्याला डुलकी लागली. तेवढय़ात खार झोपाळय़ाच्या साखळीवरून सरसर वर चढत पंख्यावर जाऊन बसली.
‘‘वा! इथून कित्ती छान दिसतंय घर!’’ तिच्या मनात आलं तेवढय़ात समोरच्या खोलीचा दरवाजा उघडला. खोलीतून आजी श्लोक म्हणत बाहेर आल्या आणि आजींना पाहून घाबरून खारीनं पंख्यावरून थेट खाली उडी मारली ती आजींच्याच पुढय़ात. मनी आणि गुब्ब्याही मियांऊ करत झोपाळय़ावरून उडी मारून पळाले. चार मिशावाली तबकडी आपलं काम मन लावून करत होती. रोबोच तो! करोनाकाळातील हेल्पर- थांबवल्याशिवाय थांबणार नव्हता.
अचानक पुढय़ात झालेल्या हल्ल्यानं आजी घाबरून जमिनीवर कोसळायला आणि दार उघडून ब्रॅन्डो आणि सूनबाई घरात यायला एकच गाठ पडली.
‘‘बापरे! आई काय झालं तुम्हाला? पडलात कशा? चक्कर आली का?’’ सूनबाई आजींना विचारू लागली. ब्रॅन्डोला घाबरून फ्रिजवर बसलेल्या मनीच्या मागे जाऊ, का खारीच्या मागे तेच कळेना! गुब्ब्या मात्र शेवटचा उरलेला मासा घेऊन खिडकीवाटे गुल झाला. खारही पळाली.
‘‘कुठे आहेत ते तिघं?’’ आजी दुखत असलेली कंबर धरून विचारू लागल्या. ‘‘थांबा आधी पाणी आणते.’’ म्हणत सूनबाई पाणी आणायला गेली आणि किंचाळलीच.
‘‘आई, माशांचं ताट रिकामं कसं? जमिनीवरही पडलाय एक मासा.’’ तो गुब्ब्याच आला असणार. आणि ती मनीही. त्यांचा आता बंदोबस्त केलाच पाहिजे.’’
‘‘त्या खारीनं उडी मारली माझ्या पुढय़ात म्हणून तर पडले मी. खाऊदेत गं त्यांना मासे. त्यांना तरी कसं मिळणार खायला! पण ती खार का बरं आली होती? आठवलं. एकदा मी तिला टीव्हीच्या पुढय़ात बसलेलं पाहिलं होतं खरं! पाहू देत तिलाही टीव्ही. ‘‘पडते बाई जरा,’’ म्हणत आजी हळूहळू चालत खोलीत गेली.

धडधडत्या अंत:करणानं गुब्ब्या, मनी आणि खार झाडावर चढून बसले. आजी पडल्याचं दु:ख त्यांनाही झालंच. चोरांना न पकडता आल्याच्या बोचणीनं ब्रॅन्डो मात्र त्रस्त झाला.

vidyadengle@gmail.com

Story img Loader