राजश्री राजवाडे-काळे

आज सगळे सोहमच्या घरी जमले होते ते गणेशोत्सवाचे कार्यक्रम ठरवायला. अवनी, ईशा, आर्य, वेद सगळे सोहमच्या घरी हजर! शिवानीसुद्धा हजर होतीच. पण खरं तर हे सगळं तिला नवीन होतं. गेली चार वर्षे अमेरिकेत राहून आलेल्या शिवानीचा भारतातला हा पहिलाच गणेशोत्सव होता. तिला जाणवत होतं की काही दिवसांपासून वातावरणात वेगळाच उत्साह संचारला होता. मंडप उभारले होते, ढोलताशांचा आवाज, दुकानांमध्ये सुंदर सुंदर गणेशमूर्ती आणि सोसायटीत कोणकोणते कार्यक्रम करायचे याच चर्चाना उधाण आलं होतं. आणि आज ही सोहमच्या घरी मीटिंग! सगळे जमल्यावर सोहमने जणू फर्मानच काढलं. ‘‘आपण या वर्षी मस्तपैकी नाटक बसवू या.’’ सगळ्यांना कल्पना आवडली. नाटक बसावायचं यावर तर एकमत झालं. अवनी म्हणाली, ‘‘आपण परीकथा बसवू.’’ त्यावर आर्य ओरडला, ‘‘हट्! परीकथा कोण बघणारे? त्यापेक्षा जाणता राजा करू.’’ सोहम म्हणाला, ‘‘त्यापेक्षा पथनाटय़ करू..’’ गोंधळ वाढतच गेला आणि काकांभोवती मुलांनी गलका केला. ‘‘काका, तुम्हीच सांगा, कोणतं नाटक बसवायचं? काकू, तुम्ही मदत कराल ना?’’ इतक्यात कोपऱ्यात गप्प बसलेल्या शिवानीकडे बाबांचं लक्ष गेलं आणि ते म्हणाले, ‘‘शिवानी, तू का गप्प? अरे, ती नवीन आहे, तिलाही बोलू द्या.’’ यावर वाईट वाटल्यासारखा चेहरा करत शिवानी म्हणाली, ‘‘मी नाटक कध्धी पाहिलं नाही, कसं करायचं ते?’’ शिवानीचं हे उत्तर ऐकून सगळे एका सुरात ओरडले, ‘‘का ऽऽऽ य? तू नाटक नाही बघितलंय?’’

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Navri Mile Hitlarla
“तुला माझ्यासाठी…”, सुनांच्या हट्टासाठी एजेने दिली शिक्षा; लीलाचा आनंद मात्र गगनात मावेना, पाहा प्रोमो
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा

‘‘नाही, कसं करायचं ते?’’

‘‘शिवानी, त्यात काय कठीण? स्टेजवर उभं राहून डायलॉग्ज् म्हणायचे.’’ वेद तोऱ्यात म्हणाला.

‘‘ए बावळट, नुसते डायलॉग म्हणणं म्हणजे नाटक नव्हे. मी शिबिरात केलंय नाटक.’’ अवनी ठसक्यात म्हणाली.

‘‘तेच ना, नाटय़शिबीर मीपण केलंय. नाटकात कामपण केलंय.’’ ईशा सांगू लागली. सोहमने आठवण करून दिली की, ‘‘तू, मी, अवनी तिघंही होतो शिबिरात. मीपण शालेय नाटय़स्पर्धेत भाग घेतलाय. खूप तालीम करावी लागते. पण खूप मज्जा येते. स्टेज, लाईटस्, मेकअप.. धम्माल.’’ आर्य उत्साहाने म्हणाला.

‘‘मी पण करू शकते?’’ शिवानीचा प्रश्न.

‘‘हो. तूही करशील.’’ वेद म्हणाला.

सोहम पुढाकार घेत म्हणाला, ‘‘हे बघ, आपण जे स्टेजवर करू ना ते प्रेक्षकांना अगदी खरं वाटलं पाहिजे. जे खरं नाही ते खरं आहे असं भासवायचं.’’

‘‘परकायाप्रवेश करायचा- म्हणजे रोलमध्ये शिरायचं.’’- इति ईशा.

‘‘रोलमध्ये?’’ शिवानीने कसंतरीच तोंड करत विचारलं.

‘‘अगं, म्हणजे भूमिकेत शिरायचं.  प्रेक्षकांकडे पाठ करायची नाही.’’अवनी सांगू लागली.

आर्य वेडावत आणि उलटं चालून दाखवत म्हणाला, ‘‘अगदी असं नाही चालायचं. वावर सहज हवा. नीट दोन पायांवर उभं राहायचं. समजलं?’’ आता मात्र अवनीनेही संधी सोडली नाही. ‘‘एका पायावर उभं राहून नाटक नाही करत कुणी. फक्त असं रेलून उभं राहायचं नाही.’’ रेलून उभं राहून दाखवलं अवनीने.

सोहम महत्त्वाचा मुद्दा काढत म्हणाला, ‘‘उच्चार स्पष्ट हवेत. आवाज मोठा हवा. वाचिक अभिनय हवा.’’ हे सगळं ऐकून शिवानीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतंच, पण बाबांनी मुलांची परीक्षा घ्यायला विचारलं, ‘‘अजून काय शिकलात नाटय़शिबिरात?’’

ईशा लगेच म्हणाली, ‘‘मी सांगते. स्टेजच्या उजव्या आणि डाव्या बाजूला जे उभं दरवाजांसारखं असतं ना त्याला ‘विंग’ असं म्हणतात, विंगेतून ‘एन्ट्री’, ‘एक्झिट’ घ्यायची.  लेव्हल्स्ही असतात. लाकडी असतात साधारण पाच फूट लांब आणि एक किंवा दोन फूट उंच वगैरे. लेव्हल्स्चा उपयोग आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो आणि लेव्हलवर जे काळं कापड टाकतात त्याला ‘मास्किंग’ असं म्हणतात.’’

आर्य म्हणाला, ‘‘नाटकाच्या दोन प्रवेशांमध्ये काळोख होतो ना त्याला ‘ब्लॅक आऊट’ म्हणतात. आणि संपूर्ण लाईट दिला की ‘जनरल’ म्हणतात. आणि एखाद्या भोवती तो लाईटचा गोल असतो ना त्याला ‘स्पॉट’ म्हणतात. मी परी झाले होते ना तेव्हा स्पॉटमध्ये उभी होते.’’ अवनी उत्साहाने म्हणाली.

आई म्हणाली, ‘‘नाटय़शास्त्र भरतमुनींनी  लिहिले आहे हे विसरलात का? ब्रह्मदेवाच्या आदेशावरून दु:खी लोकांच्या रंजनासाठी भरतमुनींनी नाटय़शास्त्र लिहिलं असं म्हणतात. अजून एक महत्त्वाची गोष्ट- नाटकातले नऊ रस- वीररस, करुणरस, शृंगार, हास्य, रौद्र, भयानक, बीभत्स, अद्भुत, शांत हे नऊ रस सांगायचा अवकाश! सगळे नऊ रसांचं सादरीकरण करण्यात दंग झाले. शिवानीला खूप मजा वाटली. बाबा सगळ्यांना शांत करत म्हणाले, ‘‘कोणतं नाटक बसवायचं यासाठी भांडत होतात ना? नाटकाचे प्रकारही शिकवले असतील ना?’’ लगेच सगळ्यांनी शिबिरात शिकवलेले नाटकाचे प्रकार सांगितले, ‘‘पथनाटय़, ऐतिहासिक, पौराणिक, विनोदी, परीकथा..’’ आईने पुढे सांगितलं, ‘‘सामाजिक, फार्सिकल, कौटुंबिक, संगीत नाटक हे पण नाटकाचे प्रकार आहेत.’’

बाबा म्हणाले, ‘‘तुम्ही मुलं तर अगदी तयार झालाय शिबिरात. मग करूच या नाटक आपण.’’

‘‘हो बाबा, म्हणजे शिवानीसारख्या नाटक न पाहिलेल्या मुलीला नाटक म्हणजे काय ते समजेल.’’ सोहमने चिडवले.

‘‘गप्प बस हं, सोहम.’’ शिवानी म्हणाली. त्यावर सगळे हसू लागले.

shriyakale@rediffmail.com

Story img Loader