सुचित्रा साठे

‘‘आजी, आपण गच्चीत आलो तेव्हा किती उकडत होतं ना! या सोनचाफ्याचं एक पानही हलत नव्हतं.’’ अपूर्वनं नेमकं तेच सांगितलं.

Where skeleton flowers grow best
‘ही’ दुर्मिळ फुले पावसाच्या पाण्यात दिसतात आरशाप्रमाणे पारदर्शी; असे का? जाणून घ्या…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
kites on Makar Sankranti
मकरसंक्रांतीला पतंग उडवितांना कुठल्या दुर्घटना घडतात माहिती आहे का?
nylon manja news in marathi
अकोल्यात नायलॉन मांजामुळे डोळाच धोक्यात… प्रशासनाच्या नाकावर टिच्चून…
Confusion due to incorrect announcements in running local trains
पुढील स्थानक ‘चुकीचे’! धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे संभ्रमावस्था
Toxic semen kill female mosquitoes australia
डासांच्या निर्मूलनासाठी विषारी वीर्याचा वापर; त्यामुळे जीवघेण्या आजारांचा प्रसार कमी कसा होणार?
International Space Center vidarbh Maharashtra
आज सायंकाळी अंतराळातील आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र डोळ्यांनी पाहता येणार….शुक्र, शनी, गुरुजवळ….

‘‘अगदी गपचूप बसली हेाती सगळी पानं.’’ जराही गपचूप न बसणाऱ्या रमानं हसत हसत सांगितलं.

‘‘आता किती छान वारा सुटलाय.. अगदी बरं वाटतंय इथे.’’ आराध्यचा चेहरा खुलला होता.

‘‘हो ना.. हा वारा म्हणजेच वायू किंवा वात, अगदी ‘भूत’ आहे. म्हणजे पंचमहाभूतांपैकी ते एक आहे. अगदी चंचल, पण शक्तिमान. समर्थ रामदास स्वामींनी या वायूबद्दल श्रीमत् दासबोध या ग्रंथात ३४ ओव्यांचा ‘वायुस्तवन’ हा समास लिहिला आहे. वायुपुत्र हनुमान हा तर समर्थाचा आदर्श आहे.’’ इति आजी.

‘‘अगं, तू वायू शक्तिमान आहे म्हणतेस, पण हा तर दिसतही नाही.’’ आराध्यला प्रश्न पडला.

समर्थ म्हणतात, ‘‘वायू रूपे कैसा आहे। भासेपरी ते न लाहे। रूप तयाचे।। हवा हलली की आपण तिला वारा म्हणतो. त्याला अमुक असे रूप नाही. वायो सत्य म्हणो जाता। परी तो न ये दाखवता। तयाकडे पाहो जाता। धुळीच दिसे। ’’ वायु दाखवता आला नाही तरी खरा आहे. त्याला पाहायचं म्हटलं तर नुसती धूळ दिसते. आजी दासबोधात शिरली.

‘‘खरंच गं, किती धूळ दिसते आहे या बाकावर आजी, थांब मी फडक्यानं पुसते, नाही तर माझा नवीन ड्रेस खराब होईल.’’ रमानं पटकन् पुसापूशी केली. पण त्या गडबडीत तिचा रुमाल उडाला. वाऱ्यानं शक्तीची चुणूक दाखवली.

‘‘वायो लागता कडाडा। मोडती झाडे। जोराचा वारा सुटला की झाडं मोडून पडतात, यातून शक्तिप्रदर्शनच होतं ना आराध्य. काळे ढग जमलेत, पाऊस पडणार असं वाटत असतं आणि पाऊस पुढे जातो. वायो तेथे चंचल रूप। सहजचि आहे।। हलकीशी झुळूक येते. शांत देहाला हुशारी वाटते. डोळे मिटून आपण गारवा अनुभवतो. पुन्हा झुळूक येईल या प्रतीक्षेत असताना उकडायला लागतं. कारण ती झुळूक घाईघाईनं पुढे गेलेली असते, इतकी ती चंचल असते.’’

‘‘आजी, चाफ्याचा सुगंध आला गं झुळकीबरोबर.’’ रमा नाक उडवत म्हणाली. अपूर्वनं रमाचं अनुकरण केलं.

‘‘शीत उष्ण वायोसरिसे। सुवासे अथवा कुवासे। असिजे परी सावकासे। तगणे न घडे।।’’ आपण शेकोटी जवळ बसलो की गरम वाटतं आणि त्यावर फिरताना गार वाटतं. कारण सुगंध असो की दुर्गंध, गरम असो की थंड, हा वायू आपल्याबरोबर त्याला घेऊनच पुढे जातो. सर्वाप्रति समभाव ठेवायची शिकवण आपल्या कृतीतून तो देत असतो. लग्नकार्यात होम चालू असला की लांब बसूनसुद्धा आपले डोळे धुरानं चुरचुरतात, त्याला कारण हा वायूच. ढगांच्या मागे लागत तो त्यांना एकत्रही करतो. त्यामुळेच तर पाऊस पडतो. पावसामुळेच तर धरणी सुजलाम् सुफलाम् होते. त्यामुळे आपलं जीवन त्याच्यावर म्हणजे वायूवर अवलंबून आहे. वायूचा खरा महत्त्वाचा गुण म्हणजे सर्वत्र जाणं. अशा सर्वगामी वायूसाठी आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे.’’ सगळय़ांच्या चेहऱ्यावरचे भाव न्याहाळत आजी बोलत होती.

‘‘आजी, खिडक्या उघडय़ा असल्या की मला खूप आवडतं. वारा येतो ना आत.’’ आराध्यनं विचारपूर्वक सांगितलं.

‘‘आपण म्हणतो ना घर हवेशीर पाहिजे, म्हणजे वारा इकडून तिकडे बागडायला हवा. सगळय़ा खोल्यांत घुसायला हवा. त्यामुळे मोकळं वाटतं. कुबटपणा, ओलसरपणा जाणवत नाही. कपडेपण कसे छान वाळून चुरचुरीत होतात. वायुजीवन चांगलं होतं.’’ आजीनं घरातल्या वाऱ्याचं कौतुक केलं.

‘‘पण वाऱ्यानं दारं आपटतात ना गं. मागे एकदा माझं बोट दारात सापडलं होतं, तेव्हा खूप दुखलं.’’ अपूर्व बोटाला कुरवाळत थोडासा कुरकुरला.

‘‘कधी तरीच होतं असं. अपूर्व ये, आजी काय सांगते ते ऐकू या.’’ रमानं तत्परतेनं त्याची समजूत काढली.

‘‘आजी, खारे वारे, मतलई वारे, र्नैर्ऋत्य, मान्सून वारे हे वाऱ्यांचे तसे सौम्य रूप. पण चक्रीवादळ, त्सुनामी हे वायूचं रौद्र स्वरूप बरोबर ना. किती नुकसान करतात ते.’’ आराध्यला फार वाईट वाटत होतं.

‘‘चैतन्य आणि चंचळ। तो हा वायोचि केवळ।। ’’ जिवंतपण आणि हालचाल हे वायूचं लक्षण आहे. सगळी पंचमहाभूतं त्यानं एकत्र कालवली आहेत. त्याला आपण हातात पकडूही शकत नाही. संपूर्ण विश्व त्यानं व्यापलं आहेच, पण आपल्या शरीरातही तो आहेच.’’ आश्चर्यानं सगळे आजीच्या तोंडाकडे बघत राहिले.

‘‘थांब, नाक दाबू का?  जीव घुसमटतो ना! म्हणजे आपल्याला या वायूची अत्यंत आवश्यकता आहे. ‘‘स्वास कोंडता देह पडे। देह पडता म्हणती मडे।

मडय़ास कर्तृत्व न घडे । कदाकाळी।।

वायोकरिता श्वासोश्वास। नाना विद्यांचा अभ्यास।

वायोकरिता शरीरास। चळण घडे।। ’’ सगळय़ा प्राणी सृष्टीची हालचाल, बोलणं, चालणं या वायूमुळे होतं. प्राण, अपान, व्यान, उदान, समान या पाच प्राणांच्या रूपानं वायू शरीरात राहतो. शिवाय ढेकर, उचकी, शिंक, जांभई पापण्यांची उघडझाप यासाठी तोच जबाबदार असतो. म्हणजे वायू रोगही पसरवतो आणि श्वसनाद्वारे आरोग्यही संभाळतो. अर्धागवायू नाव ऐकलंय ना!’’ आजीनं वायूचा थोडा मोठा डोस दिला.

‘‘आजी, मला वाऱ्यावर चालणाऱ्या पवनचक्क्या माहिती आहेत.’’ थोडी वेगळी माहिती सांगितल्याचा आनंद आराध्यच्या चेहऱ्यावर होता.

‘‘वाऱ्याचे खूप उपयोग आहेत. दूध पिताना गार होण्यासाठी फूऽ फूऽऽ करता ना. शिवाय अपूर्वला बासरी वाजवायला किंवा रमाला गायला हाच तर मदत करतो. बाकी उरलेला अभ्यास हळूहळू तुम्ही करायचा. आता इथेच थांबू या.’’

लगेच सगळे फू – फू करण्यात रंगून गेले.

suchitrasathe52@gmail.com

Story img Loader