सुरवंट या कीटकाचे सुंदर रंगीबेरंगी फुलपाखरात रूपांतर होते. मध चाखायला देणारी मधमाशी, रेशीम देणारे रेशमाचे किडे, तर शाई बनवण्याच्या कामात उपयोगी पडणारा लाखेचा किडा आणि परागीकरण करणारे कीटक, असे माणसाला उपयोगी पडणारे जीवही आपल्याला माहीत आहेत. एका गटात कीटकांची चित्रांसहीत नावे आणि दुसऱ्या गटात त्यांची वैशिष्टय़े दिलेली आहेत. तुम्हाला त्यांच्या जोडय़ा लावायच्या आहेत.
१) प्लेग या रोगाचा प्रसार करणारा, सस्तन प्राण्यांच्या जिवावर उपजीविका करणारा. २) प्रकाश देणारा निशाचर भुंगा. ३) हिच्या अंडय़ांना लिखा म्हणतात, टायफस ज्वराचा प्रसार या कीटकाद्वारे होतो. ४) हत्ती रोग, मलेरिया, डेंग्यूसारखे गंभीर आजार पसरवणारा. ५) निशाचर, जराशीही चाहूल लागली तरी चपळतेने पळून अगर उडून सांदीफटीत लपून बसणारा. ६) कामसू आणि शिस्तप्रियतेचे उदाहरण या कीटकावरून दिले जाते. हा कीटक चावताना दाहक असे फॉर्मिक अ‍ॅसिड जखमेत सोडतो. ७) निशाचर, रक्तशोषक आणि घाणेरडा वास असलेला कीटक. ८) कॉलरा, टायफाईड वगरेंसारख्या रोगांचा फैलाव करणारा कीटक.  ९) याचा रंग चांदीसारखा चकाकणारा असल्याने  याचे ‘सिल्व्हर फिश’ असे नाव आहे. १०) लाकडातील सेल्युलोज खाणारे हे कीटक उधई, पांढऱ्या मुंग्या (White ant)) या नावानेही ओळखले जातात. ११) यांची धाड पिकांचे नुकसान करतात. १२) फुलातील मध हे
याचे अन्न आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा