माझ्या छोटय़ा दोस्तांनो, अनेकदा बोलताना किंवा लिहिताना आपण असे शब्द सहज वापरतो जे आपल्या पिढीचे असतात. काय टायटॅनिक फजिती झाली किंवा अमुक तमुक कसा बाळू आहे. किंवा एखाद्या विषयात तो वा ती कशी लिंबूटिंबू आहेत.  अगदी आत्ताचं उदाहरण म्हणजे आम्ही काय लोल हसलो!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आमच्या लहानपणी सर्रास वापरले जाणारे शब्द आज माझ्या किंवा तुमच्यासारख्या माझ्या छोटय़ा दोस्तांच्या तोंडी आढळत नाहीत असं जाणवलं. माझ्या लहानपणी आम्ही पत्रांची वाट पाहायचो, तुम्ही ई-मेल किंवा चक्क मेसेजचीच वाट पाहता. माझ्या लहानपणी मी दिवाळी-नवर्वष किंवा वाढदिवसांसारख्या महत्त्वाच्या दिवसांकरता शुभेच्छापत्रं बनवून किंवा विकत घेऊन पोस्टाने मित्रांना वगैरे पाठवायचो, आता आपण सगळेच चटकन् ई-ग्रिटिंग्ज पाठवून मोकळे होतो. सध्या तर इंटरनेटच्या माध्यमातून थेट भेटवस्तू किंवा केक, फुलंदेखील परक्या शहरा-देशांत पाठवता येतात.

तंत्रज्ञानच नव्हे, इतरही अनेक गोष्टी आणि त्याअनुषंगाने त्यांच्या वापरांचे शब्द आपल्या वापरातून हद्दपार होताहेत. आज आपण बोअर होतो, कंटाळत नाही. आपण ट्रिपला जातो, सहलीला नाही. पाटा-वरवंटा, खलबत्ता, चूल, बंब, तपेली, कळशी, तांब्या-भांडं, फुलपात्रं, इतकंच काय, आम्हा शहरात वाढलेल्यांना घराला अंगण असतं हे देखील ठाऊक नसतं. फुलांचा सडा, कौलारू घराच्या पन्हाळ्यांतून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या धारा आणि ओल्या मातीचा मऊ  स्पर्श असं सारंच आमच्या आयुष्यातून हद्दपार झाल्याने त्यांची शब्दांतली अभिव्यक्तीदेखील आमच्या भाषेतून हद्दपार झाली आहे.

सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे तुमच्यापैकी अनेक चिमुकल्यांनी आपल्या शहरातल्या गमतीजमतीदेखील पाहिलेल्या नाहीत. मुंबईला नाव देणारी मुंबाईदेवी, मुंबईतल्या मूळ सात बेटांची शहरातली खूण जपणारी छोटय़ा वाडय़ा वस्त्यांतून टिकून राहिलेली शहरातली माणसं, असं आपल्याला शाळेच्या पुस्तकांतून कळेलच असं नाही. पुण्यातल्या कित्येक छोटय़ा मित्रांनी तांबट आळी पाहिली नसेल, कुंभारवाडय़ात जाऊन माठ, रांजण आणि खेळातले मातीचे बैल घडताना पाहिले नसतील. कोळशाची वखार, चांभारांकडे हमखास दिसणारी ऐरण, सोन्याच्या मापाची गूंज, तोळे ही मापं, धान्य व्यापाऱ्यांकडची शेराची मापटी, कपडय़ाचा तागा, दुधाची धार, गवळ्यांकडची चरवी, उसाच्या रसाच्या दुकानात दिसणारे चरक, तेलाच्या व्यापाऱ्यांकडे असणारे घाणे हे सारे जसे मागे पडले तसे त्यांच्याशी निगडित शब्दही आपल्या भाषेतून मागे पडत चालले आहेत. माझ्या छोटय़ा सवंगडय़ांनो, प्रत्येक भाषेतल्या शब्दांना काही विशिष्ट अर्थ असतात. त्यांना काही संदर्भ असतात. जुन्याच नाही, अगदी आजच्या आपल्या शब्दांनाही संदर्भ आहेतच की.. टायटॅनिकसारख्या मोठ्ठय़ा, दिमाखदार जहाजाचा पहिल्याच प्रवासात अपघात होऊन ते समुद्राच्या तळाशी जाण्याचा संदर्भ आज आपण एखाद्याची टायटॅनिक फिजिती झाली असं म्हणतो त्याला असतोच. खूप प्रचंड फजिती, किंवा खूप गाजावाजा करूनही फिजिती झाली असा अर्थ आपल्याला अभिप्रेत असतो. एखादी व्यक्ती अगदी पप्पू नाचते याला पप्पू काण्ट डान्स साला या लोकप्रिय गाण्याची पाश्र्वभूमी असते. तर पहिल्या पावसात भिजताना एकदम झिंग झिंग झिंगाट वाटतंय यामागे त्या गाण्यातल्या बोलांची जादू असते. आपल्या रोजच्या वापरातल्या, क्वचित कानांवर पडणाऱ्या, चुकून कुठल्या गावाकडच्या पाटीवर दृष्टीस पडणाऱ्या किंवा पार विसरून गेलेल्या शब्दांनाही असाच संदर्भ आणि अर्थ असतो. प्रत्येक शब्दाला स्वत:ची एक गोष्ट असते. या गोष्टी आपल्याला कळल्या तर? अशा अनेक गोष्टी संदर्भकोष व शब्दकोशांमधून आपल्याला कळतात; या जाडजूड पुस्तकांचा उद्देशच तो असतो. मात्र हे असे कोषबिश तुमच्यासारख्या चिमुकल्या वयात म्हणजे जरा अवघडच वाटतात नाही का? अशाच वेळी डॉ. म. वि. सोवनीलिखित शब्दगोष्टीसारखं छोटेखानी पुस्तक आपल्या मदतीला येतं.

उणंपुरं साठ पानांच्या या पुस्तकात अ ते ह या आद्याक्षरांपासून सुरू होणाऱ्या काही नियमित वापरातल्या, काही कमी ओळखीच्या तर काही अनोळखी शब्दांमागच्या धम्माल गमतीजमती सांगितल्या आहेत. तुम्ही सहलींना गेल्यावर अमुक गाव खुर्द आणि तमुक बुद्रुक अशा पाटय़ा वाचल्या असतील, तर या खुर्द आणि बुद्रुकचं काय बरं रहस्य आहे? आगोदर अभ्यास मग खेळ असं आई म्हणते तेव्हा त्या आगोदर या शब्दाची सुरुवात कशी बरं झाली? एखादी चिमुकली मुलगी गोड ‘इश्श्य’ म्हणते आणि घरीदारी तिचं कौतुक होतं. या शब्दामागचा इतिहास काय आहे बरं असा कधी तुमच्या मनात विचार आला का? किंवा अनेकदा आपले-आपले वाटणारे शब्दच आपण काही परभाषांतून किंवा त्यांच्या प्रभावातून घेतल्याचं समजतं तेव्हा आपण साहजिकच आश्चर्यचकित होतो. तुम्हाला विश्वासही वाटणार नाही अशा गंमतशीर मार्गाने हैदोस, मसाला हे आपले शब्द आपल्या भाषेत रूढ झाले आहेत. आपल्या शहरांच्या नावांच्याही गमतीजमती आहेत. सोलापूरच्या नावामध्ये सोळा पुरांचं किंवा सोळा गावांचं मिळून बनलेलं ते सोलापूर असा संदर्भ आहे.

बाराव्या वर्षी आईकडून मिळालेली शब्दगोष्टींची ही भेट मला त्यावेळी भारीच आवडली होती. एकेका पानावर एकेका शब्दाची चिमुकली गोष्ट आहे. आपल्याला माहीत असणाऱ्या शब्दांविषयी नवनवी माहिती मिळत जाते आणि हे पुस्तक वाचणं एक धम्माल होऊन जाते. कंटाळा येत नाहीच, मात्र अधिकाधिक मजा वाटते. मला हे पुस्तक फार उपयोगी पडलं. या पुस्तकाची रचना देखील अ ते ह अशी आहे. डिक्शनरी आणि शब्दकोशांची रचनाही अशीच आद्याक्षरांप्रमाणे केलेली असते. हे पुस्तक वाचण्यापूर्वी मी डिक्शनरीमधून शब्दार्थ वगैरे शोधायला शिकलो होतो, मात्र ते काम अगदीच कंटाळवाणं वाटायचं. मूळ शब्द आणि शब्दार्थ वाचला, त्याचा जेमतेम अर्थ कळला की मी त्या जाडजूड पुस्तकाकडे वळतही नसे. मात्र शब्दगोष्टींमुळे मला जाणीव झाली की शब्दांना अनेक संदर्भ असतात. त्यांत अनेक अर्थ, गमतीच्या गोष्टी दडलेल्या असतात. प्रत्येक शब्दामागे काही इतिहास असतो. डिक्शनरीमध्ये अनेकदा वेगवेगळ्या शब्दछटा दिलेल्या असतात, पर्यायीशब्दकोशांत समानार्थी-विरुद्धार्थी शब्द दिलेले असतात. एरवी या माहितीच्या खजिन्याकडे ढुंकूनही न पाहणारा मी हळूहळू त्यांचा धांडोळा घ्यायला लागलो. शब्दांचे अर्थ शोधण्यासोबतच मी त्यामागच्या गोष्टी शोधायला लागलो आणि भाषा शिकणं, वाचणं, लिहिणं, बोलणं हा एक छंद, एक खेळ होऊन गेला. कवितांचे अर्थ उलगडायला लागले, संदर्भासहित स्पष्टीकरणं सहज सोपी वाटायला लागली, र्निबधांवर पकड सुधारली. थोडक्यात काय, तर अगदी परीक्षेच्या गुंत्याची देखील उकल झाली. जसजसे नवे शब्द कळत गेले तसतशी त्यांच्यामागची गोष्ट जाऊन घ्यायची ओढ वाढायला लागली. माझ्याही नकळत मला भाषेची, शब्दांची आणि आशयाची गोडी लागत गेली. आज तुमच्याशी संवाद साधण्याचं कौशल्य, त्याची आवड आणि स्वत:ची शैली घडवण्यात या शब्दगोष्टींचा खारीचा, पण मोलाचा वाटा आहे. तुम्हीही या नव्या गोष्टी वाचून पाहा तुम्हाला त्या आवडतात का?

हे पुस्तक कुणासाठी? गोष्टी आवडणाऱ्या सगळ्याच लहान दोस्तांकरता.

पुस्तक : शब्दगोष्टी

लेखक : डॉ. म. वि. सोवनी

प्रकाशक : फुलराणी प्रकाशन

श्रीपाद –  ideas@ascharya.co.in