साहित्य : ३ डी मॉडेल्सचे उरलेले (स्टेन्सिल) तीन चौकोन, पोस्टर कलर्स, ब्रश, जिलेटिन कागद, लाल, पिवळा, हिरवा, सेलो टेप, कात्री, गम इ.
कृती- ३ डी मॉडेल्सचे उरलेले पुठ्ठय़ाचे चौकोन पोस्टर्स कलर्सने रंगवा. ते वाळू द्या. या विचित्र छिद्र असलेल्या रंगवलेल्या चौकोनांना मागील बाजूस संपूर्ण जिलेटिन पेपरने बंद करा. सेलो टेपने पटकन चिकटेल. आता तिन्ही चौकोन एकमेकांना गमच्या किंवा सेलो टेपच्या साहाय्याने त्रिकोणात एकमेकांना जोडून घ्या.  झाली आपली रंगीत लॅम्पशेड तयार. एका काचेच्या उभट ग्लासमध्ये त्यावर झडप म्हणून ठेवा. सुंदर रंगीत प्रकाश परावर्तित होईल.

Story img Loader