हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रिया आज प्रचंड उत्साहात होती. त्यांच्या पेढीवर आज लक्ष्मीपूजनाचा सोहळा होता. खरंच सोहळा होता तो. कारण, रियाचे वडील रमणशेठ हे या शहरातले सुप्रसिद्ध लक्ष्मीपुत्र. त्यामुळे त्यांच्या पेढीवर लक्ष्मीपूजन दिमाखात पार पडतं. त्यासाठी मित्रमंडळ, नातेवाईक, शेजारीपाजारी साऱ्यांनाच निमंत्रण असतं.
रिया
आज रोषणाई, रांगोळय़ा, दिव्यांची आरास, फराळ कित्ती धमाल, आमच्या पेढीवर. आजचा सण म्हणजे आमचा सण. माझे बाबा या शहरातले खूप मोठ्ठे श्रीमंत प्रस्थ. आमच्याकडे खरंच लक्ष्मी पाणी भरतेय. सोनं, नाणं, पैसाअडका यांनी घर भरून दार भरलंय. कमतरता या शब्दाची आमच्या घरात कमतरता आहे. म्हणजे कमतरता हा शब्द आमच्या घरात कुण्णाला म्हणजे कुण्णालाच माहीत नाही. ज्याला ज्याला जे जे हवं ते ते सर्व मिळणे हे आमच्या घराचं वैशिष्टय़. आम्ही श्रीमंत आहोत म्हणजे आम्ही लक्ष्मीपूजक आहोत. भरपूर पैसा मिळवणे म्हणजे लक्ष्मी मिळवणे. पैसा मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करणे म्हणजे लक्ष्मीची आराधना करणे. पण, मला असं वाटतं जे सामान्य लोक आहेत, त्यांना कसलं आलंय लक्ष्मीपूजन. ज्यांच्याकडे पैसा, सोनं, ऐश्वर्य फारसं नाहीए त्यांना कसलं आलंय लक्ष्मीपूजनाचं महत्त्व. तरीही आमचे आईबाबा त्यांच्या शेतकरी मित्रांना म्हणजे श्रीपादकाकांना, सैन्यात असणाऱ्या आमच्या शेजारच्या वागळेकाकांच्या कुटुंबीयांना, आमच्या घरी काम करणाऱ्या सखूबाई व नारूकाकांना, आमच्या शाळेतल्या बाईंना आणि इतर अनेकांना लक्ष्मीपूजनासाठी बोलावतात. काय गरज आहे या सगळय़ाची. आजीला विचारून पाहायला पाहिजे याबद्दल.
श्रीपादकाका
आज मला माझ्या मित्राकडे रमणकडे लक्ष्मीपूजनासाठी बोलावलंय. रमण हा माझा शाळासोबती. आम्ही शाळेत एका बेंचवर बसायचो. पुढे तो शहरातला प्रतिष्ठित व्यापारी झाला आणि मी शेजारच्या गावात शेती करतो. माझी ही काळी माय हीच माझी लक्ष्मी. मी सतत तिच्या संगतीत असतो, सतत तिचा विचार करतो हीच माझी भक्ती. म्हणूनच मला आज एक प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखतात. वेगवेगळी पिकं घेणं, आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करणं, सेंद्रिय शेती करणं अशा अनेक प्रकारे मी माझ्या लक्ष्मीचं पूजन करतो. तिची जास्त हानी होणार नाही, तिला कोणताही त्रास होणार नाही हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं असतं.
माझी आई व पत्नी या माझ्या शेतीत तर मदत करतातच पण बरोबर गुरंढोरं, कोंबडय़ा, कुत्री, मांजरी, शेळ्या यांच्या पालनाचं कामही आनंदानं करतात. या पाळीव प्राण्यांवर आपल्या मुला नातवंडांएवढं प्रेम करतात. त्यांच्या आवडीनिवडी, सवयी याबाबत त्या जागरूक असतात. त्यांना कोणताही त्रास होणार नाही, असा त्यांचा पुरेपूर प्रयत्न असतो. एखादी कोंबडी तरी आजारी पडली तरी माझी आई, पत्नी काळजीत पडतात. मांजराच्या पिल्लांना जिवापाड जपतात. भगवान श्रीकृष्णानी भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे प्रत्येक सजीवाच्या आत्म्यात परमेश्वर असतो. त्यामुळे हे आमचं जे शेत आहे, झाडंपेडं आहेत, हे पशुपक्षी धन आहे हीच आमची लक्ष्मी आहे. रमणशेठसारखा मी नसेन सोनं-नाणं, धनदौलत राखून. आज आम्ही नसू थाटामाटात लक्ष्मीची पूजा करणार पण माझी पत्नी माझ्याबरोबर शेतात राबताना तिच्या चेहऱ्यावर जो भाव असतो ना तोच खरा भक्तिभाव आणि आम्ही खळ्यावर धान्याच्या राशीची जी पूजा करतो ना तेच आमचं लक्ष्मीपूजन म्हणूनच तर लक्ष्मीच्या रूपांमध्ये धनलक्ष्मीबरोबरच धान्यलक्ष्मी आणि गज (पशुपक्षी) लक्ष्मी यांचाही समावेश होतो.
सरूताई
मी, माजे मालक आणि माज्या तिघी लेकी आज सकाळपास्न तयारी करतोय. आज आमाला रमणशेठ नि राधिकावयनींनी बोलावलंय. लक्ष्मीपूजन हाये आज. आमच्या लेकींसाटी ते वर्षभरातलं मोठ्ठं फंक्शन का काय ते असतं. आज त्या अगदी नटूनथटून येतील तिकडं. माजी धाकटी विचारत होती, ‘‘मम्मे, आपण का करत नाय गं असलं लक्ष्मीपूजन?’’ काय सांगू तिला आमी गरीब आहोत म्हणून नाय अशी पैशाआडक्याची पूजा करायला झेपत नाय. काय वाटंल माज्या त्या एवढुशा पोरीला.
पन, आमी लक्ष्मीची पूजा करत नाय असं कसं म्हनायचं? माज्या या दोन लक्षुम्या हायेत म्हणजे आमच्या लेकी हो. कायम आमी तेंच्यासाटीच तर काम करत असतो. आमी झोपडीत रहातो पन त्यांना कायबी कमी पडता नये असं आमाला वाटतं. त्यांना चांगलंचुंगलं खायाला गावावं, चांगले कपडे गावावेत म्हनून आमी दोगं लय म्हणजे लय काम करतो. माजी धाकटी लेक खेळाडू हाये. ती रोज सक्काळी साडेपाच वाजता व्यायाम का काय तो करायला मैदानावर जाती मीबी तिच्यासोबत जाती रोज. थोरलीचं शिक्षण संपून आता ती पुढल्या परीक्षा देतीय तिलाबी आमी कलास लावलाय. या पोरी माज्या लक्षुमीच. त्यांना कसलीबी झळ पोचू नये म्हनून आमी दोघं सतत जपत असतो. रमणशेठच्या आई सांगत होत्या संतानलक्षुमी असा लक्षुमीचा एक प्रकार असतो म्हनं. आमी ही संतान लक्ष्मीची पूजा करत असतो की वर्षभर. या माज्या दोनीबी पोरींना तेंच्या पायावर उबं करणं हेच माजं लक्ष्मीपूजन.
रियाच्या बाई
आज रियाच्या घरी म्हणजे रमणशेठकडे लक्ष्मीपूजनाचं बोलावणं आहे, केवढा मोठा कार्यक्रम असतो तो. कित्ती श्रीमंत आहेत ते पण आमचं किती प्रेमानं आगतस्वागत करतात, किती आदर करतात सर्वाचा. मला वाटतं म्हणूनच त्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न आहे. तिथे गेल्यावर मला पूर्वी वाटायचं की आपण किती गरीब आहोत, आपल्याकडे रमणशेठसारखं ऐश्वर्य नाही म्हणून मला फार बुजल्यासारखंही व्हायचं पण नंतर जेव्हा लक्ष्मीबाबत वाचत गेले तेव्हा लक्षात आलं विद्येची पूजा हीही लक्ष्मीची पूजा आहे. माझ्याकडे आलेला प्रत्येक विद्यार्थी हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे पारंगत झाला पाहिजे, त्याच्या वयाला आवश्यक ते ज्ञान व कौशल्य त्याला मिळालंच पाहिजे. यासाठी मी वर्षभर प्रयत्न करीत असते हीच माझी लक्ष्मी भक्ती. म्हणूनच तर आपल्या पूर्वजांनी लक्ष्मीच्या रूपांमध्ये विद्यारूपी लक्ष्मीचा समावेश केलेला आहे. लक्ष्मी या शब्दाचा अर्थ- लक्ष्य- या शब्दाच्या अनुषंगाने शोधला जर लक्ष्मी म्हणजे तुमचं ध्येय ओळखणे आणि ते समजून घेणे. माझ्या अनेक विद्यार्थ्यांना मी त्याचं ध्येय ठरवण्यासाठी सतत मदत करते हेच माझं लक्ष्मीपूजन.
सावंतकाकू
आज रमणशेठनी लक्ष्मीपूजनासाठी बोलावलंय. आम्ही सगळे जाणारच पण माझे पती नाही येऊ शकणार, कारण ते सैनिक आहेत आणि सध्या ते सीमेवर आहेत. साधा लक्ष्मीपूजनाचा बत्तासा खाणंही त्यांच्या नशिबात नाहीए, कारण आम्हाला दिव्यांची आरास करायला मिळावी म्हणून त्यांना आपल्या डोळ्यांची पापणी न लवता सीमेचे रक्षण करावं लागतं. माझे पती हे एक लक्ष्मीरूपच आहे. साहस हे ते रूप आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आमचं लक्ष्मीपूजन. वीरलक्ष्मी हे लक्ष्मीचं एक रूप आहे तिचीच आम्ही भक्ती करतो असं मला वाटतं. ही वीरलक्ष्मी माझ्या पतीसारख्या साहसी लोकांमध्ये वास करत असते. ह्य़ा वीरलक्ष्मीएवढीच विजयलक्ष्मीही महत्त्वाची असते. यश मिळवून देण्यासाठी ती मदत करते. बरोबर यशसंपादनात अडचणी येऊ नयते म्हणून यशसंपादनात येणारे अडथळे दूर करण्यासाठी ती आशीर्वाद देते. आज आपल्या देशाची प्रगती पाहता, प्रत्येक सैनिकामध्ये ही वीर आणि विजयलक्ष्मी वसलेली असते हे स्पष्ट दिसतं आणि एक भारतीय नागरिक म्हणून या सैनिकांच्या पाठीशी राहणं हेच खरं लक्ष्मीपूजन.
रिया
बापरे! आज्जीला किती चुकीचा प्रश्न विचारला होता मी. हे जे सारेजण आमच्याकडे जमलेत ते कशा कशा प्रकारे लक्ष्मीपूजन करतात हे ऐकून खूपच भारी वाटलं मला. आजीने कसं मस्तपणे समजावून दिलं मला. बरोबरच कसं सुंदर पटवून दिलं की लक्ष्मी म्हणजेच ‘श्री’ ती तर सगळीकडे असतेच कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण श्री असं लिहूनच करतो एवढंच काय कोणत्याही देवाच्या नावामागेही श्री लिहितो. ही श्री म्हणजे समृद्धी आणि शक्ती. श्रीची उपासना म्हणजे कष्ट. म्हणूनच म्हटलंय ‘उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी’ म्हणजेच लक्ष्मी म्हणजे केवळ श्रीमंती नव्हे तर इतरही काही आहे. मलाही आता माझ्या विद्या लक्ष्मीच्या श्री पूजनाला लागलं पाहिजे.
joshimeghana.23@gmail.com