शहरांमध्ये सुद्धा खूप देशी-विदेशी झाडं आसपास असतात, पण अनेक वेळा आपलं त्यांच्याकडे लक्षही जात नाही. तुम्हा सगळ्यांना आंबा, नारळ, िपपळ, वड, अशोक (खरं तर हा आसुपालव आहे), पारिजातक, चाफा, जांभूळ, फणस आणि गुलमोहर परिचयाचे आहेतच. त्याशिवाय विलायती शिरीष, सोनमोहर, ताड, शेवगा, भेंड, देशी बदाम, सुवर्णपर्ण, माहोगनी, महारुख, सातवीण, सुबाभूळ, निलगिरी, पिचकारी, रानबदाम, उंदीरमार, गोरखचिंच व कैलाशपती अशी कितीतरी झाडं आपल्या आसपास उद्यानांत व रस्त्यांच्या कडेला दिसतात, पण अनेकांना ती ओळखता येत नाहीत. छोटी झुडपं व वेली यांच्याबद्दल सांगत बसलो तर इथे जागाच पुरणार नाही!
पूर्वी जेव्हा सर्वत्र लहान गावं व जंगलं होती तेव्हा तिथे असणाऱ्या झाडांपकी सावर, साग, वावळ, बहावा, कदंब, करंज, तामण (ज्याचं फुल महाराष्ट्राचं राज्यपुष्प आहे), बकान नीम, चंदन, उंबर व पांगारा अशी झाडं आपल्याला अजूनही शहरात काही ठिकाणी दिसतात. ग्रामीण भागात ही सगळी झाडं जास्त संख्येने दिसतात, तर जंगलात यांच्याव्यतिरिक्त बिजा, अर्जुन, बिब्बा, कुडा, पळस, बारतोंडी, हिरडा, हेदू, सीता अशोक, खैर, चारोळी व धामणसारखी अन्य झाडं व बांबू गर्दी करून उभे असतात.
या झाडांचे उपयोग तरी किती- काही झाडं सावली देतात, तर काही फळं देतात. झाडांमुळे हवा शुद्ध राहते, जमिनीची धूप थांबते, पूर येत नाहीत, धुळीचा त्रास कमी होतो, रात्रीच्या जास्त दिव्यांचा त्रास होत नाही, औषधं व लाकूड मिळतं आणि पशु-पक्ष्यांना आसरा व अन्न मिळतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे झाडांमुळे डोळ्यांना व मनाला शांत वाटतं. पण इतकं सगळं आपल्यासाठी करूनसुद्धा, आपण मात्र न संपणाऱ्या गरजा पुरवण्याकरता झाडं तोडत असतो. हे बरोबर आहे का? नीट ऐका- त्या खिडकीबाहेरच्या िपपळपानांची नादमधुर सळसळ ऐकू येते आहे. जणू काही झाड आपल्याला सांगतंय ‘‘या, माझ्या सावलीत बसा, आपण गप्पा मारू!’’ ल्ल
ं३४’२ं३ँी@८ंँ.ूे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा