दोस्तांनो, तुम्हाला कॉम्प्युटरवर गेम्स खेळायला खूप आवडतात ना? तुम्ही कधी इंग्रजी शब्द ऐकून त्याची स्पेलिंग भराभर टाईप करण्याचा खेळ कधी कॉम्प्युटरवर खेळून पाहिला आहे का? आज आपण अशाच काही साइट्स पाहणार आहोत.
१)https://www.learner.org/interactives/spelling/index.html या साइटवर वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसाठी सोप्या शब्दांपासून कठीण शब्दांची स्पेलिंग लिहिण्यासाठी काही वाक्ये ऐकवली जातात. ही वाक्ये स्क्रिनवर तुम्हाला वाचताही येतात. प्रत्येक वाक्यातील एखादा शब्द गाळलेला असतो. जो तुम्हाला ऐकून रिकाम्या जागी टाईप करायचा आहे. हा शब्द तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकता येतो. हिंट म्हणून त्या शब्दाचा अर्थ देखील बघता येतो. सर्व शब्द भरून झाल्यावर तुम्हाला ते तपासता येतात.
२)http://www.tvokids.com/games/spellingbee ह्या साइटवर एकावेळी एक याप्रमाणे पंचवीस शब्दांच्या स्पेलिंग्ज तुम्हाला लिहायच्या असतात. वरील सर्व सुविधा येथेही आहेत.
३)http://www.arcademics.com/games/spelling-bees/spelling-bees.html ह्या साइटवरील स्पेलिंगचा खेळ अतिशय मनोरजंक आहे. या साइटवरील विनामूल्य खेळात प्रवेश करताना तुम्हाला एक नाव देण्यात येते. जसे की, ‘player 346′ आता तुम्ही खेळातून बाहेर पडेपर्यंत याच नावाने खेळता. तुमची तीन स्पर्धकांबरोबर स्पर्धा असते. हे तीन स्पर्धक तुमच्यासारखेच साइटवर खेळण्यासाठी आलेले असू शकतात. किंवा तुमची स्पर्धा कॉम्प्युटरबरोबर असू शकते. खेळाला सुरुवात केल्यावर स्क्रिनवर इंग्रजीची २६ मुळाक्षरे दिसतात. तुम्हाला एका वेळी एक याप्रकारे शब्द ऐकवले जातात. तसेच एक घडय़ाळ दिसते. तुम्हाला एका मिनिटात जितकी जास्त स्पेलिंग टाईप करता येतात, तेवढे तुम्हाला जास्त गुण मिळतात. टाईप करायला सुरुवात केल्यावर स्क्रिनवर एक मधमाशी तुम्ही टाईप केलेले एकेक अक्षर दिलेल्या स्पेलिंगच्या खाचेत बसवते. तुम्ही निवडलेले अक्षर चुकीचे असल्यास मधमाशी ते अक्षर हातातून सोडून देते. एक मिनिट पूर्ण झाल्यावर चार स्पर्धकांपैकी एका मिनिटात कोणी जास्त स्पेलिंग्ज् लिहिल्या त्यानुसार विजेता घोषित करण्यात येतो.
४)http://www.bigiqkids.com/OnlineSpellingBee.html या साइटवर तुम्ही वयानुसार तुमचा स्पर्धेचा गट निवडू शकता. प्रत्येक गटात पाच वेगवेगळ्या लेव्हल्स आहेत. सोप्यापासून सुरुवात होते. आणि त्याची काठिण्य पातळी हळूहळू वाढत जाते. एकेक लेव्हल पुढे जाण्यासाठी प्रत्येक लेव्हलमधे प्रत्येकी तीस शब्दांची स्पेलिंग लिहावी लागतात. तुम्हाला एक शब्द ऐकवला जातो. नंतर एक वाक्य दर्शवले जाते. त्यातील गाळलेल्या जागी हा शब्द भरायचा असतो. तसेच त्या शब्दाचा अर्थ आणि समान अर्थी शब्दसुद्धा बघता येतात. तो शब्द पुन्हा पुन्हा ऐकता येतो. ह्या शब्दाचे स्पेलिंग ९० सेकंदात लिहायचे असते. लिहिलेले स्पेलिंग चुकल्यास गेममधून तुम्ही बाहेर पडता. पुन्हा खेळण्यासाठी ३१८ ंॠं्रल्ल हा पर्याय असतो.
आज इंग्रजी या भाषेचे महत्त्व बघता यासारखे खेळ तुम्हाला या भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी उपयोगी होतील यात शंका नाही.
मनाली रानडे – manaliranade84@gmail.com
इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग शिका
दोस्तांनो, तुम्हाला कॉम्प्युटरवर गेम्स खेळायला खूप आवडतात ना? तुम्ही कधी इंग्रजी शब्द ऐकून त्याची स्पेलिंग भराभर टाईप करण्याचा खेळ कधी कॉम्प्युटरवर खेळून पाहिला आहे का?
आणखी वाचा
First published on: 14-06-2015 at 12:05 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Learn english vocabulary and spellings