‘चित्रकथी’चीच मोठी बहीण असणारी आणि भिंती-कागदावर मात्र नसलेली ही शॅडो- लेदर पपेट्स!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दक्षिण भारतात पपेट्सची खूप मोठी परंपरा आहे. त्यातील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागातदेखील पिंगुळी गावातील फिरत्या कलाकारांसारखे कथाचित्र सांगणारे कलाकार आहेत. यातही तालासुरात, त्यांच्या भाषेत  मुख्यत्वे रामायण व महाभारत सांगितले जाते. फक्त दोन गोष्टींत फरक जाणवतो, एक म्हणजे पिंगुळी कला ही छोटय़ा आकारात असतात. तर लेदर पपेट्स मात्र मोठय़ा पडद्यावर साकारले जाते. चामडय़ाच्या तुकडय़ाला खूप घासून पारदर्शक पापुद्रय़ासारखे केले जाते. इतके की त्यातून पलीकडला धुरकट प्रकाश दिसू शकतो. आता चित्रात दिसणारा हत्ती, वानर, हरीण आणि वाघोबा पाहा. प्राण्यांच्या अवयवानुसार तुकडय़ा तुकडय़ात हे प्राणी बनतात. म्हंजे.. वाघाचे पंजे!

उदाहरण म्हणून हत्ती घ्या. चित्र चामडय़ावर काढले जाते. त्याचे चार पाय, भलेमोठे पोट, डोके  आणि हत्तीची सर्वात जास्त हलणारी लवचीक, पण शक्तिशाली सोंड कापली जाते. (या सोंडेत काही हजार स्नायू असतात, हे आपल्याला माहित्येय.) तर या चित्रातील सोंडेला पाच-सहा तुकडय़ांत कापले जाते. त्यावर नक्षी काढली जाते. त्यातील काही नक्षी नैसर्गिक रंगात रंगवली जाते. ती छिद्रांनी केली जाते. हे सर्व अवयव एकमेकांना दोऱ्याने बांधले जातात. या प्राण्याच्या मागच्या बाजूला दोन किंवा तीन काठय़ांनी आधार दिला जातो. त्याच काठय़ा हाताने धरून पपेट्स पडद्यावर नाचविले जातात. अशा अनेक बाहुल्या एकाच वेळी पडद्यावर दोन-तीन कलाकारांद्वारे नाचविल्या जातात.

मागच्या प्रखर दिव्यांमुळे पडद्यावर या पपेट्सची रंगीत सावली पडते. रात्रभर चालणाऱ्या या सावल्यांची चित्रकथा सर्व प्रेक्षक पडद्याच्या उलटय़ा बाजूने पाहतात. चित्रसराव म्हणून तुम्ही हा कठीण प्रकार करून पाहा. आणि या वेळी मात्र मोठय़ांची मदत घ्या. एका कागदावर वेडेवाकडे सरपटत जाणाऱ्या सापाचे चित्र काळ्या स्केचपेनने काढा व जलरंगात रंगवा. त्यामागे दोन्ही टोकांना दोन काडय़ा सेलोटेपने चिकटवा. (मोठय़ा मुलांनी मात्र सापाला त्याला तीन भागांत कट करा. पेटत्या अगरबत्तीने छिद्र पाडत नक्षी करा व रंगवा. ते तीन तुकडे एकमेकांना दोरीने जोडा. मग एकाच वेळी तीन मोठय़ा मलई कुल्फी खा. तिन्ही तुकडय़ांना त्या कुल्फीच्या काडय़ा सेलोटेपने चिकटवा.) आता सूर्यप्रकाशात हे साप धरा व मजा घ्या.

श्रीनिवास आगवणे – shreeniwas@chitrapatang.in