आपल्या जादूई लेखणीच्या सहाय्यानं भा. रा. भागवतांनी मराठी बालकांचं भावविश्व अधिक समृद्ध केलं. त्यांचा खट्याळ ‘फास्टर फेणे’ आजही मुलांच्या आवडीचा. भागवत मुलांसाठी ‘बालमित्र’ नावाचं मासिक चालवत. कालौघात विस्मृतीत गेलेल्या या मासिकातील दर्जेदार साहित्य डायमंड पब्लिकेशनने पुनर्प्रकाशित केलं आहे ते ‘निवडक बालमित्र’ या अंतर्गत. ‘रंजक कथा’ आणि ‘सुरस व्यक्तिचित्र’ असे दोन विभाग करून हे साहित्य प्रसिद्ध केले आहे. उत्तम कादंबरीकार, भाषांतरकार असे अनेक गुण भागवतांच्या ठायी होते. त्याचे पडसाद या ‘बालमित्र’मध्ये दिसून येतात. ही पुस्तके नव्या प्रदेशांची, नव्या माणसांची आणि विलक्षण कथांची अनोखी सफर घडवून आणतात. हे साहित्य वाचल्यावर मुलांना सतत सकस साहित्य पुरवण्याची भागवतांमधली धडपड दिसून येते.

अनेक मान्यवर साहित्यिकांचं उत्तमोत्तम साहित्य यातून वाचायला मिळतं. दुर्गा भागवत, रा. वा. उपळेकर, देवदत्त नारायण टिळक, मालती दांडेकर अशा अनेक साहित्यिकांच्या कथा, अन्य भाषांतील कथांचा अनुवाद, छोटेखानी लेख वाचायला मिळतात. या मासिकांतील विज्ञान, साहस, थोरामोठ्यांच्या आयुष्यातल्या रंजक गोष्टी वाचणं एक बहारदार अनुभव आहे. सुरस व्यक्तिचित्रांमध्ये गांधीजी, हेन्री फोर्ड, साने गुरुजी, राइट बंधू, न्यायमूर्ती रानडे, दादाभाईनौरोजी, डॉ. आनंदीबाई जोशी, कार्व्हर अशा विविध क्षेत्रांतल्या महान व्यक्तींचा परिचय करून दिला आहे. लहानग्यांसोबतच मोठ्यांसाठी ही पुस्तके म्हणजे पर्वणीच!

Case against tuition teacher, tuition teacher pune,
मुलीशी अश्लील कृत्य प्रकरणी शिकवणी चालकाविरुद्ध गुन्हा
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
teacher lost 20 lakh rupees share market
शिक्षकाला वीस लाखांचा गंडा, सुरतचे तीन आरोपी गजाआड; बुलढाणा सायबरची कारवाई
Schoolboy commits suicide after not getting mobile phone sangli
सांगली: मोबाईल न मिळाल्याने शाळकरी मुलाची आत्महत्या
16-year-old boy runs away from home after mother gets angry over mobile phone use
पालकांनो सावध व्हा… मोबाईलचे व्यसन मुलांसाठी ठरू शकते घातक; वाचा काय घडलं ते…
pimpri teacher beaten up with hammer
पिंपरी : लिफ्टमध्ये घुसून शिक्षिकेला हातोडीने मारहाण
Educational institution director remanded in police custody for negligence in sexual assault case
लैंगिक अत्याचार प्रकरणी दुर्लक्ष केल्याचा ठपका, शिक्षण संस्थाचालकाला न्यायालयीन कोठडी

हेही वाचा : आंबेडकरी अभिव्यक्तीला नवी पालवी…

‘निवडक बालमित्र : रंजक कथा’, ‘निवडक बालमित्र सुरस व्यक्तिचित्र’, संपादक- भा. रा. भागवत, डायमंड पब्लिकेशन्स, पाने-१९८, ११८ अनुक्रमे, किंमत- अनुक्रमे- ४००, २५० रुपये.

महाभारतातील संस्कारक्षम व्यक्तिरेखा

मुलांना भारतातील पौराणिक गोष्टींचा साहित्य वारसा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी त्या गोष्टीरूपात मुलांना सांगणे जास्त महत्त्वाचे आहे. तरच त्यांना भारतीय साहित्याची ओळख होईल. ‘चार कौन्तेय आणि सखा श्रीकृष्ण’ हे अलका ताटके यांचे पुस्तक याच स्वरूपाचे आहे. महाभारतातील ठळक व्यक्तिरेखा मुलांना नव्याने शब्दबद्ध करून त्यांची थोडक्यात ओळख करून दिली आहे. दानशूर कर्ण, सत्याचे पालन करणारा युधिष्ठिर, बलाढ्य पराक्रमी भीम, धनुर्धर अर्जुन आणि सखा कृष्ण अशी या कथनाची मांडणी करण्यात आली आहे. महाभारतातील या व्यक्तिरेखांमुळे मुलांची मने संस्कारक्षम होतील हा या पुस्तकामागचा मुख्य उद्देश आहे. ‘चार कौन्तेय आणि सखा श्रीकृष्ण’, अलका ताटके, मनोरमा प्रकाशन, पाने-५२, किंमत- १०० रुपये.

आजीनातवंडांच्या संवादातून शब्दगंमत

‘म्हेंज्ये काय गं आज्जी?’ हे अनुजा बर्वे यांचे पुस्तक केवळ लहानग्यांसाठीच नव्हे तर मोठ्यांसाठीही जुन्या शब्दांचे अर्थ गोष्टी रूपात सांगणारा शब्द खजिनाच. आजी-नातवंडं यांच्यातील संवादातून हे पुस्तक साकारलं आहे. आजी- नातवंडं यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यातील संवादातून मराठीतील लोप पावत चाललेल्या गमतीशीर शब्दांच्या अर्थाची उकल करण्यात आली आहे. या पुस्तकामुळे आजी- नातवंडं यांच्यातील विरळ होत चाललेला संवाद या पुस्तकाच्या रूपाने वाचकाला गोड अनुभव देतो. लेखिकेने सुरुवातीलाच म्हटले आहे की, मायबोलीतील ही शब्दांची गंमत लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या पुस्तकाची मांडणी केली आहे.

हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: अवकाशाची निर्मिती

अगदी गोष्टींच्या नावांपासून शब्दांची गंमत अनुभवायला मिळते. जसे की- ‘मोड! मोडणे!! मोडीत!!!’’, ‘घोळे, घोळात घोळ…’, ‘पात्र, फुलपात्र, मेषमात्र’, ‘शिव, शीव, की…?’ तसेच मराठीत प्रचलित असलेली गीतंही वाचायला मिळतात. विशिष्ट शब्दांचे व्याकरण, त्याचे वेगवेगळे अर्थ गोष्टीरूपात वाचणं म्हणजे पर्वणीच. या पुस्तकामुळे मराठी भाषेेतील विस्मरणात गेलेले जुने शब्द, गाणी वाचायला मिळतात हे या पुस्तकाचे श्रेय. हे शब्द, म्हणी, त्यांचे मुलांना नव्याने सांगितलेच जात नाहीत. हे पुस्तक नेमकं हेच सांगतं. हे पुस्तक मुलं वाचतील तेव्हा त्यांना ते रटाळही वाटणार नाही, कारण गोष्टीरूपात आपल्या आजीकडूनच हे शब्दज्ञान घेत आहोत अशी अनुभूती येईल.

इंग्रजी, हिंदी भाषेच्या भडिमारात मराठी लोकच मराठी भाषेचा उपयोग करत नाहीत अशी सध्या स्थिती आहे. अशा वेळी ती लहानग्यांमध्ये पुन्हा रुजविण्यासाठी अशा छोटेखानी पुस्तकांची भूमिका महत्त्वाची ठरते.

‘म्हेंज्ये काय गं आज्जी?’, अनुजा बर्वे, इन्किंग इनोव्हेशन्स प्रकाशन, पाने-१७५, किंमत- ३५० रुपये.

Story img Loader