साहित्य : सोनेरी, हिरवा (वेगवेगळय़ा छटा), चॉकलेटी रंगाचा हँडमेड पेपर, स्केचपेन, पेन्सिल, कात्री, गम इ.
कृती : सोनेरी रंगाच्या कागदाची साधारण ३x३० इंचाची पट्टी कापून घ्या. (तोरणासाठी तुमच्या दाराचे आडवे माप मोजून घ्या.) ही पट्टी साधारण ३ बाय ३ या आकारात एकमेकांवर दुमडून छोटा (आयत) बनवा. या दुमडीवर आपटय़ाच्या दुपानांचे चित्र पेन्सिलने काढा व आकारात कापा. लांबलचक पानांची लडी तयार होईल. या पानांच्या आतील मापात इतर हिरव्या रंगाच्या छटांपासून आणखी पाने बनवा.
रंगछटांप्रमाणे ही पाने सोनेरी पानांवर चिकटवा. स्केचपेनने त्यावर स्वस्तिक, ॐ, सरस्वतीची रूपे आकृतीबद्धपणे चित्ररूपात रंगवा. ही सर्व पाने चॉकलेटी रंगाच्या जाड पट्टीवर चिकटावा. एक सुंदर इकोफ्रेंडली तोरण तयार होईल.
आपटय़ाच्या पानांचे तोरण
साहित्य : सोनेरी, हिरवा (वेगवेगळय़ा छटा), चॉकलेटी रंगाचा हँडमेड पेपर, स्केचपेन, पेन्सिल, कात्री, गम इ. कृती : सोनेरी रंगाच्या कागदाची साधारण ३x३० इंचाची पट्टी कापून घ्या.
First published on: 28-09-2014 at 01:03 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta art corner