मुक्ता चैतन्य
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
समजा, तुम्हाला रोजच्या रोज तुमच्या बागेतली ताजी भाजी मिळाली तर? पालक पराठे आईने ताज्या घरच्या पालकांचे केले तर? दुधी भोपळ्याचे कोफ्ते बाबाने घरच्या ताज्या भोपळ्याचे बनवले तर? किती मज्जा येईल ना? शिवाय तुम्हाला कधीतरी स्वयंपाक करावासा वाटला तर गच्चीवर किंवा गॅलरीत जायचं, हवी ती भाजी तोडून आणायची आणि मस्त पदार्थ बनवायचा. किती छान आहे ना ही कल्पना!
आपण शाळेत सायन्सच्या प्रोजेक्टला गाजर पाण्यात ठेवून त्याला हिरवी पालवी कशी फुटतेय हे बघतोच ना! किंवा कडधान्यांना मोड आणण्याचे उद्योग करतोच. आताच दिवाळी झाली. किल्ला बनवताना अळीव आणि धणे पेरतो, जेणेकरून किल्ल्यावर चटकन हिरवळ तयार व्हावी. म्हणजे आपल्याला या विषयातलं अजिबातच काही येत नाही, कळत नाही असं कुठे आहे?
बागकाम ही मोठी गमतीशीर गोष्ट असते बरं का! त्यासाठी तुमच्याकडे मोठ्ठी जागा हवी असंही नाहीये. घराच्या छोटय़ा-मोठय़ा गच्चीत, गॅलरीत, बाल्कनीत आपण कुंडय़ांमधून फुले, भाजीपाला सहज घेऊ शकतो. आई-बाबा या सगळ्यासाठी मदत करतातच. शिवाय, इंटरनेटवर तुम्ही शोधलं तर गच्चीत, बाल्कनीत छोटीशी शेती कशी करायची याची माहिती तुम्हाला सहज मिळू शकते. याचा वापर करून तुम्ही घरच्या घरी सहज शेती करू शकतो. रोज लागणारा भाजीपाला आपण घरीच पिकवू शकता. शिवाय, आपल्यासाठी शेतात राबणारा शेतकरी नेमकं कसं आणि किती काम करतो हेही आपल्याला समजू शकतं. शिवाय तुम्हाला माहीत आहे का, बागकाम हा सगळ्यात मस्त फॅमिली टाइम असतो. एरवी तुम्ही आणि आई-बाबा सगळेच आपापल्या कामात बिझी असतात, अशा वेळी सगळ्यांनी मिळून बागकाम केलं तर तुम्हाला सगळ्यांना एकत्र वेळ घालवता येईल. एकत्र वेळ घालवण्यासाठी दर वेळी मॉलमध्ये किंवा हॉटेलात जायला हवं असं कुठेय? सगळ्यांनी मिळून बागकाम केलं तरीही मस्त एकत्र वेळ घालवता येईल आणि काहीतरी पिकवल्याचं समाधान मिळेल. कशी आहे आयडिया? शाळेतही तुम्ही अशी मित्रमत्रिणींना बरोबर घेऊन छोटीशी शेती/बाग तयार करू शकता.
अजून एक कानगोष्ट सांगते. तुमच्या या कल्पनेला आई-बाबा एकदम तयार होतील असं नाही. त्यांनाही दिवसभर काम करून कंटाळा आलेला असतो. अशा वेळी वेगळं काहीतरी करायला ते पटकन तयार होत नाहीत. मग रविवारी असले उद्योग करायला काढायचे. सुरुवातीला १०-१५ मिनिटे करू या, असं आई-बाबांना सांगा म्हणजे कुणाचाच वेळ सुरुवातीला जास्त जाणार नाही. मग सगळ्यांनाच त्यात मजा यायला लागली की वेळ किती असावा याचा विचार करण्याची गरजच उरणार नाही.
आता तुम्ही म्हणाल, ते सगळं ठीक आहे; पण बागकाम करायचं कसं?
..तर त्यासाठी इंटरनेटवर चिक्कार साइट्स आणि व्हिडीओज् उपलब्ध आहेत. अगदी लहान मुलांसाठीही काही साइट्स आहेत. त्यांच्या लिंक्स देते आहेच, शिवाय आता तुम्ही इंटरनेटचे सजग वापरकत्रे झालेले आहात याची मला खात्री आहे. त्यामुळे इंटरनेटवरून तुम्हीही साइट्स, व्हिडीओज् शोधून हे काम सहज हाती घेऊ शकाल.
मग करणार ना सुरुवात? घेणार ना आई-बाबांना बरोबर? त्यांनाही शिकवा गच्चीशेती करायला!
काही उपयुक्त साइट्स
http://www.mykidsadventures.com/kids-gardening

https://www.yates-kids-gardening.com
https://www.betterhealth.vic.gov.au/health/healthyliving/gardening-for-children
https://www.growveg.com/guides/help-kids-grow-plant-a-school-garden
http://www.bbc.co.uk/gardening/gardening_with_children
https://www.kidspot.com.au/things-to-do/collection/gardening-for-kids
muktaachaitanya@gmail.com
(लेखिका समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत.)