दिवाळीची सुट्टी संपली की शाळेत काही ना काही तरी उपक्रम चालू होतात. कधी विज्ञान प्रदर्शन, तर कधी वार्षिक सहल, कधी पालकांबरोबर स्नेहसंमेलन तर कधी खेळाचे सामने. दिवस कसे भराभर निघून जातात. नोव्हेंबर -डिसेंबर महिने म्हणूनच रिया, सॅम, आनंद आणि झिया सगळ्यांनाच आवडत असत. आजच वर्गात बाईंनी सांगितले होते. ‘‘मुलांनो आता थोडे दिवस राहिले आहेत, मग आपल्याला कसली सुट्टी मिळणार आहे?’’

‘‘ख्रिासमसची…’’ सगळ्या मुलांनी एकसुरात उत्तर दिलं.

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Mumbai Municipal Corporation , Class two Test,
मुंबई : स्वयंअध्ययनातील निपुणतेसाठी दुसरीच्या विद्यार्थ्यांची चाचणी
Parents who give nylon manja to their children are also facing action by nashik police
मुलांना नायलॉन मांजा देणारे पालकही कारवाईच्या फेऱ्यात
Viral Video Shows Students Dance On Fevicoal Se Song
हे दिवस पुन्हा येणे नाही…! ‘फेव्हिकॉल से’ गाण्यावर विद्यार्थ्यांचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून जुन्या आठवणीत जाल रमून
chaturanga  article on Menstruation and menopause
ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती : सर्जनशीलतेच्या वाटेवर चालताना
Jessica Alba husband Cash Warren separation
२० वर्षांची साथ अन् ३ मुलं, प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडप्याचा १६ वर्षांचा संसार मोडला?
Nashik Municipal Schools Face Teacher Shortage,
शिक्षणमंत्र्यांच्या नाशिकमध्ये शिक्षकांची वानवा; मनपा प्राथमिक शिक्षकांची माध्यमिकमध्ये नियुक्तीची वेळ

‘‘अगदी बरोबर!’’ बाई म्हणाल्या. ‘‘पण त्या आधी आपण शाळेत नाताळ सण साजरा करतो की नाही?’’ बाईंनी विचारलं.

‘‘हो ना! दरवर्षी आपण शाळेत सगळे सण साजरे करतो.’’ रिया म्हणाली.

‘‘मग यावर्षीही आपल्याला ख्रिासमस साजरा करायचा आहे. त्याची तयारी करावी लागेल ना आपल्याला?’’ बाईंनी सांगितलं.

‘‘यावर्षी आपण काय करणार आहोत बाई?’’ सॅमला प्रश्न पडला.

‘‘आपल्याला यावर्षी ख्रिास्तजन्माची नाटुकली सादर करायची आहे.’’ बाई म्हणाल्या.

‘‘पण गेल्या वर्षी आपण गाणे म्हटले होते.’’ झियानं सांगितलं.

‘‘हो बरोबर! काही मुले नृत्य करणार आहेत, दुसरी मुलं कॅरोल सिंगिंग (नाताळ पूर्व बाळ येशूच्या आगमनाची तयारी करताना गातात ती गाणी) करणार. आपण आता वरच्या वर्गात आलो ना! म्हणून आपल्याला नाटक बसवायचं आहे.’’ बाईंनी झियाची समजूत काढली.

‘‘नाटक म्हणजे सगळी पात्र जमवावी लागतील आता.’’ आनंद अगदी मोठ्या माणसांसारखं बोलत होता.

‘‘हो. आपल्याला माता मरिया, जोसेफ, दोन मेंढपाळ, तीन राजे आणि एक देवदूत एवढी पात्र लागतील.’’ बाई म्हणाल्या.

‘‘पण मग ‘बाळ येशू’ कुठून आणणार बाई?’’ रियाला समजत नव्हतं.

‘‘मला एक आयडिया सुचली…’’ सॅम म्हणाला.

‘‘काय रे काय सॅम?’’ बाईंनी विचारायच्या आतच सगळ्यांनी गिल्ला केला.

‘‘माझ्या आत्याला छोटं बाळ आहे. बाळ येशू म्हणून आपण त्याला आणूया.’’ सॅम अगदी निरागसपणे सांगत होता.

‘‘अरे सॅम असं लहान बाळाला कोणी आणतात का? रडेल ना ते.’’ बाई हसत म्हणाल्या. ‘‘बाळ येशू म्हणून आपण एक बाहुली घेऊ या…’’

‘‘हो चालेल बाई. माझ्याकडे आहे तशी बाहुली.’’ झियानं सांगितलं.

‘‘बरं, आता नाटकात कोण कोण भाग घेणार?’’ बाईंनी विचारलं.

‘‘मी… मी…’’ बऱ्याच जणांनी हात वर केले.

‘‘बरं… आधी मुख्य पात्रं निवडू… आनंद तू जोसेफ आणि रिया तू माता मरिया; झिया तू देवदूत. सॅम आणि सुहास तुम्ही दोघे मेंढपाळ असणार. निक, रूई आणि रोहित तुम्ही तीन राजे (तीन विद्वान पुरुष जे बाळ येशूला भेटायला येतात).’’ बाईंनी सगळी पात्रं ठरवून दिली.

‘‘बाई, पण मग आम्ही काय करायचं?’’ जिमी, राजू, मिहीर यांनी विचारलं.

‘‘तुमचं काम एकदम महत्त्वाचं. या सगळ्यांचं काम व्यवस्थित कसं होईल हे पाहायचं आणि त्यांना लागेल ती मदत करायची; कळलं का?’’ बाईंनी त्यांनाही दिलासा दिला.

दुसऱ्या दिवसापासून सगळा वर्ग तयारीला लागला. छोटी छोटीच वाक्यं होती, पण ती त्यांच्याकडून पाठ करून घ्यायला काहीजण मदत करत होते. नाटकाच्या दिवशी स्टेजवर काय काय लागेल त्याची तयारी काही मुलं करीत होती. काहींनी आपल्याकडे असलेल्या खेळण्यातून गव्हणीत ठेवायला गाई, वासरं आणली होती. काहींनी तीन राजांसाठी उंट आणले, तर काहींनी मेंढरे आणली. बाळ येशूचा जन्म गाईच्या गोठ्यात झाला म्हणून जिमीने गव्हाण सजविण्यासाठी वाळलेलं गवत आणलं. बाळ येशूला झोपायला मात्र झियानं थोडा कापूस आणला.

सोहळ्याचा दिवस उजाडला. सगळी शाळा पताका आणि चांदण्या लावून सजली होती. सण साजरा करायचा म्हणून सर्व मुलं नवीन ड्रेस घालून आली होती. मुलींचा उत्साह तर भारीच होता. कोणी फ्रॉक घातलं होतं, तर कोणी चुडीदार. कुणी घागरा चोळी घालून नटल्या तर काहींनी जीन्स व टी शर्ट.

कार्यक्रम सुरू झाला. एक एका वर्गानं आपलं सादरीकरण केलं. एकदम लहान मुलं तर अगदी छोट्या देवदूतांसारखी दिसत होती. आपल्या थोड्या बोबड्या बोलांनी गाणी गाऊन त्यांनी मजा आणली. मग दोन-तीन नृत्य सादर झाली. शेवटी नाटकाचा नंबर आला.

इतके दिवस झियाच्या वर्गातील सगळी मुलं तयारी करीत होती. आता स्टेजवर सगळं मांडायची वेळ आली तेव्हा लक्षात आलं की, माता मरिया झालेल्या रियानं डोक्यावरून घ्यायची ओढणीच आणली नव्हती. मग इथे तिथे शोधाशोध सुरू झाली.

‘‘रिया ही घे ओढणी…’’ वर्गातील शरयुनं आपल्या शरारावरील ओढणी रियाला आणून दिली. खरं तर तिलाही नाटकात काम करायचं होतं; पण तिला चान्स मिळाला नव्हता. नंतर मिहिरच्या लक्षात आलं की बाळ येशूचा जन्म झाल्यावर मोठा स्टार लावतात त्याची एका बाजूची दांडी तुटली होती. तेवढ्यात दुसऱ्या वर्गातील शुभमला ते कळलं. नाटकाची वेळ होत आली होती.

‘‘मिहिर तुम्ही नाटकाला सुरुवात करा… चांदणी शेवटी लागणार आहे ना? तोपर्यंत मी ती दुरुस्त करतो.’’ शुभम म्हणाला.

‘‘थॅंक्यू शुभम.’’ मिहिरला एकदम भारी वाटलं.

नाटक सुरू झालं. देवदूतानं माता मरियेला संदेश दिला की ‘‘बाळ येशू तुमच्या उदरी जन्माला येईल.’’ स्टेजवरून परत येताना देवदूत झालेली झिया लांब झग्यात अडखळली, पण जिमीनं पुढे जाऊन तिला सावरलं.

नंतर जोसेफ व माता मरिया बेथलेहेम शहरात जातात, पण त्यांना राहायला घर मिळत नाही म्हणून ते एका गुरांच्या गोठ्यात राहतात. तेथेच बाळ येशूचा जन्म होतो. तोपर्यंत शुभमने चांदणी दुरुस्त केली होती. ती स्टेजवर लावल्यावर चांदणी पाहून मेंढपाळ आपली मेंढरे घेऊन बाळाला भेटायला येतात.

‘‘चला निक, रूई, रोहित आता तुम्हाला जायचं आहे स्टेजवर… राजे आहात ना तुम्ही?’’ मिहिरनं आठवण करून दिली.

‘‘हो… हो… जातो.’’ रूई म्हणाला. ‘‘पण माझा उंट कुठे आहे?’’

‘‘हं. हा घे तुझा उंट. हातात बाजूला धर नुसता…’’ रोहितनं रूईच्या हातात उंट दिला. मग तिन्ही राजांनी स्टेजवर प्रवेश केला. आपले उंट बाजूला बांधले आणि बरोबर आणलेल्या भेटी अर्पण केल्या. मग सर्वांनी मिळून एक गाणे म्हटले- ‘‘आज गव्हाणी निजले बाळ… पाहू चला…’’

अशाप्रकारे नाटकाची सांगता झाली. सर्वांच्या मदतीमुळे नाटक खूप छान झाले. त्यामुळे टाळ्यांचा कडकडाट झाला. सगळ्या मुलांना खूप आनंद झाला.

एवढ्यात पीटीच्या सरांनी गाणे लावले. ‘‘जिंगल बेल… जिंगल बेल… जिंगल ऑल द वे… सांताक्लॉज इज कमिंग…’’ आणि खरंच एक लाल डगला घालून सांताक्लॉज आला. त्याच्याकडे मोठी झोळी होती. त्या झोळीत तो चक्क चॉकलेट घेऊन आला होता. नाचत नाचत तो मुलांमध्ये फिरत होता आणि चॉकलेट वाटत होता. मुलांनी खूप मजा केली, नाचले, गाणी गायली. शेवटी ‘हॅपी ख्रिासमस’ म्हणून एकमेकांना शुभेच्छा देऊन नाताळ सण साजरा केला.

matildadsilva50@yahoo.co.in

Story img Loader