अंकिता अविनाश कार्ले

गोष्टींची पुस्तकं वाचणारा, गोष्टी ऐकणारा, बालगीतं म्हणणारा सन्मय आता शाळेत जाऊ लागला. तिथे त्याला नवीन मित्र भेटले. त्यांची छान मैत्री झालीय. शाळेत ते एकत्र खेळतात, खूप गप्पा मारतात, दंगा करतात. त्यातील अनय नावाचा मित्र त्याचा अगदी खास आहे. गंमत म्हणजे ते दोघं एकाच सोसायटीमध्ये राहत असल्यामुळे त्यांना तिथेही भेटता येतं. खाली सोसायटीच्या बागेत ते एकत्र खेळतात बरं का!

Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Paithani web series on Zee 5 OTT entertainment news
आई मुलीच्या नात्याची ‘पैठणी’
Musical dance drama Urmilayan Aryans Group of Companies Kamesh Modi
सांगीतिक नृत्यनाट्य ‘ऊर्मिलायन’
Natasa Stankovic reacts On Divorce From Hardik Pandya
घटस्फोट झाल्यानंतर पहिल्यांदाच नताशा हार्दिक पंड्याबाबत म्हणाली, “आम्ही अजूनही…”
bomb explosion at railway station in Quetta pakistan
Pakistan Blast: पाकिस्तानच्या क्वेटा रेल्वे स्थानकावर भीषण बॉम्बस्फोट, २१ लोकांचा मृत्यू
secrecy in marriage
वैवाहिक नात्यातही गोपनीयता महत्त्वाची!
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट

एके दिवशी काय झालं, दोघांनी ठरवलं आज सन्मयच्या घरी खेळायचं. सन्मयने घरी तशी कल्पना दिली. आईने दोघांसाठी छान खाऊचा बेतही केला. पण सन्मयचं काही लक्ष नव्हतं, त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळाच विचार चालू होता हे आई आणि आजीच्या लक्षात आलं. तो त्याची सगळी खेळणी गोळा करत होता. आधी आई व आजीला वाटलं, हा गुणी मुलासारखं सगळं आवरून ठेवतोय. त्या खूश झाल्या, पण त्यांना आश्चर्य वाटलं की सन्मयने ती खेळणी नेहमीच्या जागी ठेवायच्या ऐवजी आपल्या खोलीत ठेवून दिली. त्या दोघींनीही त्याला विचारलं की, तू असं का करतोयस?

सन्मय म्हणाला, ‘‘अनय घरी येणार आहे ना, मग तो माझी खेळणी घेईल ना! तो माझ्या खेळण्यांशी खेळेल, ते मला नाही आवडत. मला माझी खेळणी कोणालाही द्यायला नाही आवडत… म्हणून मी ती लपवून ठेवली.’’ त्याचं हे म्हणणं ऐकून आजी आणि आईनं त्याला समजावलं, ‘‘असं करू नये. आपण आपलं खेळणं शेअर करावं… तो तुझा मित्र आहे की नाही! मग त्याला तुझं खेळणं द्यावं.’’

पण सन्मयला ते तितकंसं पटलं नाही. ठरल्याप्रमाणे अनय आला. त्यांनी टीव्हीवर कार्टून पाहिलं. खाऊ खाल्ला आणि मजा केली. पण शेवटपर्यंत सन्मयने त्याच्याशी आपली खेळणी काही शेअर केली नाही.

थोड्या दिवसांनी सन्मय अनयच्या घरी खेळायला गेला. पण या वेळी सन्मय सोबत त्याची आजीही आली होती. एव्हाना सन्मयची आजी आणि अनयची आजी या दोघींचीही चांगली मैत्री झाली होती म्हणून तीही गप्पा मारायला आली होती. अनय मात्र सन्मयला आपल्या खोलीत घेऊन गेला आणि आपली सगळी खेळणी त्याच्या पुढ्यात ठेवून म्हणाला, ‘‘तुला कुठलं खेळणं हवं ते घे खेळायला.’’ सन्मयला आश्चर्य वाटलं, कारण त्याला तर असं शेअरिंग आवडलं नव्हतं. मग तो अनयला म्हणाला, ‘‘मी तुझं खेळणं घेतलं तर तुला राग नाही येणार ना?’’

यावर अनय म्हणाला, ‘‘अरे नाही. मला अजिबात राग येणार नाही. उलट मला आनंद होईल. माझ्या खेळण्यांशी खेळून माझे मित्र खूप आनंदी होतात… खूप मजा येते. मी त्यांच्याकडे गेलो की तेही मला त्यांची खेळणी देतात. मग मलाही खूप आनंद होतो. खूप मज्जा येते.’’ त्यांच्यातील हा संवाद ऐकून दोन्ही आजी गालातल्या गालात हसल्या. सन्मयला मात्र थोडी लाज वाटली. त्याला कळलं की आपणही असं शेअरिंग केलं पाहिजे. खेळण्यांचं शेअरिंग करून सगळेच आनंदीत होणार.

घरी आल्यावर सन्मयनं आईला काय घडलं ते सांगितलं. तो आई आणि आजीला म्हणाला, ‘‘तुम्ही त्या दिवशी मला जे सांगितलं होतं ते आता मला पटलं आहे. जे कोणी माझे मित्र घरी येतील त्यांना मी माझी खेळणी जरूर देईन!

अशा प्रकारे आपल्या सन्मयला शेअरिंगची गंमत कळली बरं का! तुम्हीपण ती अनुभवा…

karleankitaavi@gmail.com