|| ज्योत्स्ना सुतवणी

सोबतच्या चौकटीत काही अक्षर समूह दिलेले आहेत. प्रत्येक अक्षर समूहाने शेवट होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दांची जोडी तुम्ही शोधायची आहे. त्यासाठी अर्थातच सूचक माहिती दिलेली आहे.

१) नायट्रोजन आणि हायड्रोजन यांचे संयुग असणारा तीव्र वासाचा वायू.

२) फुप्फुसाचा गंभीर रोग.

३) तांबूस-काळसर दिसणारे आंबट-गोड चवीचे रसाळ फळ

४) बोरॅक्सचे मराठी नाव. काच, चिनीमातीची भांडी चकचकीत बनवण्यासाठी हा वापरतात.

५) सहारा हे जगातील सर्वात मोठे उष्ण—–.

६) फुलपाखराची अळी, खाजरे केस असलेली अळी

७) —– मोजण्यासाठी अंश सेल्सिअस, फॅरनहाइट, केल्विन ही एकके वापरली जातात.

८) पोर्ट ब्लेअर ही —– आणि निकोबार बेटांची राजधानी.

९) पर्यावरणाशी जुळवून घेण्याची सजीवांची क्षमता.

१०) —– म्हणजे पृथ्वीचे स्वत:भोवती फिरणे

११) रात्री अन्न शोधायला बाहेर पडणारे प्राणी.

१२) पाण्यात राहणारे प्राणी.

 

उत्तरे

१) अमोनिया  २) न्युमोनिया  ३) आलुबुखार  ४) टाकणखार   ५) वाळवंट  ६) सुरवंट

७) तापमान  ८) अंदमान  ९) अनुकूलन  १०) परिवलन  ११) निशाचर  १२) जलचर.

jyotsna.sutavani@gmail.com