सृ ष्टीकर्त्यांने आपली गुणमयी माया जेवढी उघड केली आहे, त्यापेक्षा जास्त लपविली आहे. निसर्गातले, अवकाशातले निगूढ ठाव शोधून काढण्याचे आव्हान मानवाला दिले आहे. पाणकळ्याच्या दिवसात असे निगूढ ठाव शोधून काढणे अडचणीचे असले तरी अशक्य नसते.
वृश्चिक राशीतील ‘ज्येष्ठा’ या रक्तवर्णी तांबूस तारकेचा तुम्हाला परिचय असेल तर एम-४ या नावाने ओळखला जाणारा बंदिस्त तारकागुच्छ (Globular Cluster) शोधून काढणे तुम्हाला कठीण जाणार नाही. रंगाबाबत मंगळाशी स्पर्धा करणाऱ्या आणि आकाशस्थ िवचवाच्या उदरात असणाऱ्या ‘ज्येष्ठा’ (Antares) तारकेच्या पश्चिम अंगास एक ते दीड अंशावर तुम्हास या बंदिस्त तारकागुच्छाचे दर्शन होईल.
नुसत्या डोळ्यांनी सहज दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या सीमारेषेवर त्याची तेजस्विता असल्याने या अंधूक तारकागुच्छाला शोधणे तितकेसे सोपे नाही. तुमच्याकडे द्विनेत्री (Binocular) असेल तर सराईत निरीक्षकाला याचे दर्शन लगेच होईल. हे सर्व गुच्छ आपल्या उदरात असंख्य तारकांना जागा देऊन मोकळे झाले आहेत. पण अतिदूरत्वामुळे त्यातले तारे एकेक करून आपल्याला टिपता येत नाहीत. इतकेच नव्हे, तर धूसर अशा बाह्यरूपामुळे या कोंदणात अगणित तारे आहेत याची कल्पनाच आपणास येत नाही. तुमच्याकडे ४ इंची िभगाची दुर्बीण असेल तरच या गुच्छात मांडीला मांडी लावून बसलेले तारे तुम्हाला दिसतील. नुसत्या डोळ्यांनी दिसणारे एक दृश्य आणि दुर्बणिीतून दिसणारे दुसरे दृश्य यामुळे आपण एकच वस्तू पाहतो की भिन्न वस्तू पाहत आहोत, असा संभ्रम निर्माण होईल. अशा नजर संभ्रमात टाकणाऱ्या या गुच्छाचा प्रथम साक्षात्कार झाला तो डी-चसेक्स या ज्योतिर्वदिाला. नेपच्यून ग्रहाच्या शंभर वर्षे अगोदरची म्हणजे १७४६ सालची ही गोष्ट आहे. पुढे मेसिएने १७६४ मध्ये त्याच्या यादीत या गुच्छाचा समावेश केला आणि या गुच्छाला एम-४ अशी ओळख प्राप्त झाली. अशा नावीन्यपूर्ण गोष्टींची म्हणजे दीíघका, तेजोमेघ, तारकागुच्छ यांची आता एक तालिका बनविली आहे. न्यू जनरल कॅटलॉग (NGC) या नावाने ती ओळखली जाते. एम-४ चा NGC क्रमांक ६१२१ असा आहे.
१७८३ मध्ये विल्यम हर्शलने या तारकागुच्छाचा सखोल अभ्यास केला. या तारकागुच्छाचे अंतर आपल्यापासून साधारण ७००० प्रकाशवष्रे असले तरी त्यात ४३ रूपविकारी तारे शोधले गेले आहेत. भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर यांच्या संशोधनामुळे सर्वमुखी असलेले श्व्ोतबटू (white dwarf) तारेही या तारकागुच्छात गवसले आहेत. हबल दुर्बणिीमुळे १९९५ साली असे तारे या एम-४ तारकागुच्छात आढळून आले. इतकेच नव्हे, तर पल्सार प्रकारचे आणि पल्सार व जोडीला श्व्ोतबटू असे जोडतारेही या गुच्छात आहेत. १९८७ साली अतिशय वेगाने स्वांग परिवलन करणारा (३ मिली सेकंदाचा) पल्सार तारा या गुच्छात मिळाला आहे. तेव्हा अद्भूत आश्चय्रे आपल्या उदरात सामावून घेणाऱ्या एम-४ तारकागुच्छाचे दर्शन घेण्याची संधी तुम्ही अवश्य घ्या.