अमोल खेळून दुपारी घरी आला. आल्या आल्याच आईला म्हणाला, ‘‘आई, पोटात कावळे ओरडताहेत. लवकर जेवायला वाढ.’’
आई म्हणाली, ‘‘कपडे बदलून हात-पाय धू, तोपर्यंत मी जेवण वाढायला घेते.’’ आई आणि अमोल जेवायला बसले. अमोल आज खूप खुशीत होता. ‘‘आई, मी आज ‘विज्ञानाची करामत’ पुस्तक वाचलं. त्यात खूप छान प्रयोग आहेत. आज मी तुला व माझ्या मित्र-मैत्रिणींना जादूची अंडी दाखवणार आहे.’’
‘‘जादूची अंडी? ती कशी काय?’’
‘‘आई, आपली जेवणं झाल्यावर जादूची अंडी पाहूया.’’
दोघांचीही जेवणं झाली. अमोल म्हणाला, ‘‘आई, एका डिशमध्ये तीन अंडी दे. सारख्या आकाराच्या व मापाच्या तीन काचेच्या बरण्या दे. प्लॅस्टिकच्या पारदर्शक बरण्या असल्या तरी चालतील.’’ दुसरीकडे अमोलने तयारी सुरू केली. एका मोठय़ा भांडय़ात पाणी, दोन वाटय़ा मीठ आणि एक चमचा घेतला. अमोलने आपल्या मित्रांना आमंत्रण दिलंच होतं. ती सगळी मंडळी त्याच्या घरी आली. तो सर्वाना ऐटीत म्हणाला, ‘‘मी तुम्हाला आज गंमत दाखवणार आहे- जादूची अंडी’’.
‘‘जादूची अंडी?’’ मुग्धा आश्चर्यानं ओरडली.
‘‘ती कशी?’’ – रमेश.
‘‘सगळं सांगतो. आपण सर्वानी मिळून प्रयोग करू या. सगळ्यांनी नीट लक्ष द्या.’’ मुलांसोबत आईही गंमत पाहायला बसली. एका टेबलावर अमोलने थोडय़ा थोडय़ा अंतरावर एकसारख्या तीन काचेच्या बरण्या ठेवल्या. तीन अंडी, पाणी, मीठ सर्व त्यानं प्रथम सर्वाना दाखवलं. पहिली बरणी साध्या पाण्याने पूर्ण भरली. दुसरी बरणीही साध्या पाण्याने पूर्ण भरली. दुसऱ्या बरणीत त्यानं थोडं मीठ घातलं. मीठ विरघळेपर्यंत चमच्यानं ढवळलं. मीठ विरघळलं की नाही, हे सर्व मुलांना पाहायला सांगितलं. सर्व मुलांनी मीठ पाण्यात विरघळलेलं पाहिलं. आणखी थोडं मीठ त्याच बरणीत टाकलं आणि बराच वेळ ढवळलं. थोडं मीठ बरणीत शिल्लक होतं. ते विरघळत नव्हतं.
‘‘आता त्या बरणीत मीठ विरघळत का नाही?’’ नयानाचा प्रष्टद्धr(२२४)्ना.
‘‘आता या पाण्यात मीठ विरघळण्याची क्षमता संपली. यालाच मिठाचा संपृक्त द्राव म्हणतात.’’ – अमोलनं स्पष्टीकरण दिलं.
‘‘हो, प्रयोगशाळेत सरांनी संपृक्त द्राव तयार केला होता.’’- इति मयूर.
अमोलनं तिसरी बरणी घेतली. अध्र्या बरणीत मिठाचा संपृक्त द्राव तयार केला. तो संथ झाल्यावर उरलेल्या अध्र्या भागात अलगद साधे पाणी भरले. अमोलने तिन्ही बरण्यांचं निरीक्षण करण्यास सांगितलं. थोडय़ा वेळानं अमोलनं तीन अंडी दाखवली व मयूरला म्हटलं, ‘‘यातील कोणतंही एक अंडं साध्या पाण्याच्या बरणीत ठेव.’’ मयूरनं एक अंडं साध्या पाण्याच्या बरणीत अलगद सोडलं. ते बरणीच्या तळाशी गेलं. नयनानं दुसरं अंडं मिठाच्या संपृक्त द्रावाच्या बरणीत अलगद सोडलं. मिठाच्या संपृक्त द्रावावर अंडं तरंगत राहिलं. स्वातीनं तिसरं अंडं ंतिसऱ्या बरणीत अलगद सोडलं. ते अंडं बरणीत मध्येच तरंगत राहिलं.
सर्व मुलं ओरडली, ‘‘अरे, अंडय़ांची जादूच आहे ही! एका बरणीत अंडं तळाशी जातं. दुसऱ्या बरणीतील अंडं वर तरंगतं आणि तिसऱ्या बरणीतील अंडं मध्येच तरंगतं.’’
‘‘अमोल, हे कसं झालं ते आता आम्हाला सांग,’’ मयूर उत्सुकतेनं म्हणाला.
‘‘मयूर, यात अंडय़ांची जादू किंवा करामत काहीच नाही. त्याला शास्त्रीय कारण आहे. हे सर्व पाण्याच्या आणि अंडय़ांच्या घनतेवर अवलंबून आहे.
त्यावर रूपेश स्पष्टीकरण देत म्हणाला, ‘‘घनता ही वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर आहे. घनता = वस्तुमान (टं२२)/ आकारमान (श्’४ेी). कमी घनतेच्या द्रव्यात जास्त घनतेचा पदार्थ बुडतो. पहिल्या बरणीतील पाणी साधं आहे. अंडय़ाच्या घनतेपेक्षा पाण्याची घनता कमी आहे. त्यामुळे पहिल्या साध्या पाण्यातील अंडं बरणीच्या तळाशी जातं. पाण्याच्या तळाशी जाणाऱ्या दोन पदार्थाची नावे सांगा.’’
‘‘खिळा, नाणं.’’ आता पाण्यावर तरंगणाऱ्या दोन वस्तूंची नावे सांगा. ‘‘लाकूड, कागदाची होडी.’’ मुलांनी पटापट उत्तरं दिली. तरंगणाऱ्या वस्तूची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी म्हणून त्या तरंगतात.
जास्त घनतेच्या द्रवात कमी घनतेचा पदार्थ तरंगतो. दुसऱ्या बरणीतील मिठाच्या संपृक्त द्रवाची घनता वाढली, पण अंडय़ाची घनता तेवढीच राहिली. म्हणजेच मिठाच्या संपृक्त घनतेपेक्षा अंडय़ाची घनता कमी आहे. त्यामुळे दुसऱ्या बरणीतील मिठाच्या संपृक्त द्रावातील अंडं वर तरंगतं.
रूपेश म्हणाला, ‘‘मला समजलं. तिसऱ्या बरणीचं मी सांगतो. तिसऱ्या बरणीत वर साधं पाणी आहे. साध्या पाण्याची घनता अंडय़ाच्या घनतेपेक्षा कमी असल्यामुळे बरणीत साध्या पाण्यापर्यंत अंडं खाली गेलं आणि खाली मिठाचा संपृक्त द्राव असल्यामुळे संपृक्त द्रावाची घनता जास्त आणि अंडय़ाची घनता कमी; त्यामुळे ते संपृक्त द्रावावर तरंगतं. त्यामुळे ते आपल्याला बरणीत मध्येच तरंगताना दिसतं.’’
अमोल म्हणाला, ‘‘वा! छान समजलं तुला.’’
अमोल साध्या पाण्यातील अंडं आपण मिठाच्या संपृक्त द्रावातील बरणीत सोडलं तर?’’ – मुग्धाचा प्रष्टद्धr(२२४)्ना.
‘‘तूच बघ प्रात्यक्षिक करून.’’
मुग्धानं मिठाच्या संपृक्त द्रावातील अंड बाहेर काढलं आणि डिशमध्ये ठेवलं व साध्या पाण्यातील अंड मिठाच्या संपृक्त द्रावात सोडलं. ते अंड पृष्ठभागावर तरंगत राहिलं. नंतर मिठाच्या संपृक्त द्रावातील अंडं साध्या पाण्याच्या बरणीत सोडलं. ते बरणीच्या तळाशी गेलं. सर्व मुलांना शास्त्रीय तत्त्व समजलं. अमोलनं प्रत्यक्ष कृती व निरीक्षणातून मुलांना समजावून दिलं. सर्व मुले खूश झाली.
अमोल म्हणाला, ‘‘जादूगार हातचलाखीनं, काही शास्त्रीय तत्त्वं वापरून आपल्याला जादू दाखवतात.’’ अमोलचा आत्मविश्वास वाढला होता. अलिबाबाची गुहा सापडल्यासारखा तो खूप आनंदात होता.
आई म्हणाली, ‘‘अशा प्रकारची वेगवेगळी विज्ञानावर आधारित पुस्तकं वाचा. त्यातील प्रयोग करा. कृती निरीक्षण करून शास्त्रीय कारणं शोधून काढा. आजवर शास्त्रज्ञांनी अनेक शोध लावले. त्यात त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं. एखादा शोध लावताना ते तहान-भूक, दिवस-रात्र विसरतात. त्यांनी त्याचा ध्यासच घेतलेला असतो. जिद्द, चिकाटी आणि अतोनात मेहनतीने ते यशस्वी झालेत. तुम्ही सर्व मुलांनी असाच अभ्यास करून आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करा.’’ तिनं मुलांना खाऊ दिला. सर्व मुलं प्रेरणा घेऊन आपापल्या घरी गेली.
जादूची अंडी
अमोल खेळून दुपारी घरी आला. आल्या आल्याच आईला म्हणाला, ‘‘आई, पोटात कावळे ओरडताहेत. लवकर जेवायला वाढ.’’
First published on: 10-05-2015 at 12:32 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Magic eggs