एका बागेत खूप सारी मेपलची झाडं होती. त्या सगळय़ा मेपलच्या झाडांची बागेतल्या खारी, पक्षी, ससे यांच्याशी खूप दोस्ती होती. सगळे जण गप्पा मारत, हसत आणि आनंदात वेळ घालवत. बागेतल्या मेपलच्या झाडांपैकी एक झाड मात्र सगळय़ांपेक्षा जरा वेगळं होतं. त्याला जरा जरी दुखलं खुपलं तरी सहन व्हायचं नाही. त्याला वाटायचं की, आपण फक्त या बागेत राहतो. आपला काहीच उपयोग नाही. असं काही तरी कारण काढून तो कायम रडत असे.

मेपलच्या झाडावर जेव्हा फळं लागली तेव्हा ती खायला जंगलातल्या खारोटय़ा झाडावर यायला लागल्या. एके दिवशी रडकं मेपलचं झाड खारोटीला म्हणालं, ‘‘मी फक्त या बागेत उभा आहे, मी काहीच काम करत नाही. मी कोणाच्याच उपयोगाचा नाही, त्यामुळे मला फार उदास वाटतं.’’

The unique friendship of a leopard and a deer
“अशी मैत्री कधी पाहिली नसेल…” बिबट्या आणि हरणाची अनोखी मैत्री; VIDEO पाहून व्हाल थक्क
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
Boy Spoils Sister's Rangoli Caught on CCTV
संधी साधली अन् बहिणीने काढलेली रांगोळी खराब केली, पण अशी झाली पोलखोल, VIDEO एकदा पाहाच
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
konkan hapus mango season likely to deley due to prolonged monsoon
लोकशिवार: लांबलेल्या पावसाने ‘आंबा’ही लांबवला
Savlyachi Janu Savli
Video : “आयुष्यातला अंधार…”, सावली आणि सारंगचे लग्न होणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
leopard and deer Viral Video
‘नशीब प्रत्येक वेळी साथ देत नाही…’ हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्या वेगाने धावला; पण पुढे जे घडलं… VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका

खारोटी मेपलला म्हणाली, ‘‘अरे! तू आम्हा सर्वांच्या उपयोगाचा आहेस. आम्ही झाडावरची फळं खातो, ससे तुझी कोवळी पानं खातात. ते आमचं अन्न आहे.’’ पण झाडाला काही ते पटलं नाही. ते म्हणालं, ‘‘तुम्ही फळं आणि पानं तोडता तेव्हा मला खूप दुखतं. माझा हा उपयोग मला पसंत नाही.’’ आता पुढे काय बोलावं हेच खारोटीला समजत नव्हतं.

काही दिवसांनी त्या मेपलच्या झाडावर दोन-तीन पक्षी आले. मेपलच्या झाडानं त्यांनादेखील आपली रडकथा सांगितली. त्यावर पक्षी म्हणाले, ‘‘एवढंच ना. आम्ही आमच्या इतर मित्रमैत्रिणींना बोलावतो आणि तुझ्या फांद्यांवर घरटी बांधायला सांगतो. आम्ही त्यात अंडी घातली की इथे ती अगदी सुरक्षित राहतील.’’ मेपलचं झाड म्हणालं, ‘‘तुम्ही घरटी बांधताना फांद्यांना चोची मारणार. त्यानं मला दुखेल. तुम्ही सगळे जण इथे खूप किलबिलाट करणार, त्याचा मला त्रास होईल. त्यामुळे माझा हा उपयोगदेखील मला पसंत नाही.’’

हेही वाचा… बालमैफल: शांतिरूपेण संस्थिता..

त्यानंतर एके दिवशी दोन माणसं बागेतल्या मेपलच्या झाडांच्या खोडाला चीर पाडून त्यातला चीक गोळा करायला आले. मेपलची झाडं हिवाळय़ापूर्वी आपल्या खोडात व मुळांमध्ये स्टार्च जमा करून ठेवतात. या स्टार्चचं साखरेमध्ये रूपांतर होतं आणि हिवाळय़ानंतर ते चिकाच्या स्वरूपात बाहेर येतं. या चिकावर प्रक्रिया करून साखर व मेपल सिरप बनवलं जातं. चीक गोळा करण्यासाठी मेपलच्या खोडाला चीर पाडल्यामुळे त्याला खूप दुखलं व ते रडायला लागलं. त्याच वेळी सारा बागेत आली होती. मेपलच्या झाडाचं रडणं ऐकून ती झाडाजवळ थांबली. त्या वेळी ससे, पक्षी, खारोटय़ा सगळे जण तिथे आले. त्यांनी साराला सांगितलं की, ‘‘तू आता याची समजूत काढ, आम्ही सांगितलेलं त्याला काहीच पटत नाही. त्याला सारखा कशाचा तरी त्रास होत असतो. मला दुखतं, माझा काही उपयोग नाही असं म्हणून तो सारखा रडत बसतो.’’

सारा मेपलला म्हणाली, ‘‘अरे, तुझा काही उपयोग नाही असं का म्हणतोस? तुझ्यापासून मेपल सिरप मिळतं, पक्ष्यांना आपली घरटी बांधून अंडी घालायला तुझ्या फांद्या सुरक्षित वाटतात. खारोटय़ा आणि सशांना त्यांचं अन्न मिळतं. तुझा या सगळय़ांचा किती तरी प्रकारे उपयोग होतो.’’ तरीसुद्धा मेपलला ते काही पटलं नाही. तो म्हणाला, ‘‘इतरांना माझा अशा प्रकारे उपयोग होतो; पण मला त्याचा खूप त्रास होतो. मला इजा होते आणि दुखतं.’’ असं म्हणून तो आणखीनच रडू लागतो.

हे ऐकल्यावर साराला मेपलच्या रडण्याचं खरं कारण कळलं व ती त्याला म्हणाली, ‘‘अरे, हळूहळू तुमच्या हिरव्या पानांचा रंग बदलून ती पिवळी, केशरी आणि लाल रंगाची होतील. असा रंगीबेरंगी पानांच्या तुम्हा मेपलची गणना काही सुंदर झाडांमध्ये केली जाते. तुमची खरी ओळख म्हणजे ऋतूप्रमाणे बदलणारे तुमच्या पानांचे रंग आणि फॉलमध्ये होणारी त्या लाल, पिवळय़ा रंगांची पानझड. मग या बागेत तुमच्या रंगीबेरंगी पानांचा अक्षरश: सडा पडलेला असेल आणि सगळा परिसर तुमच्या सौंदर्यामुळे उठून दिसेल. तुमचं रूप आणि ही पानझड बघण्यासाठी लोकांच्या झुंडीच्या झुंडी इथे येतील. ते तुमचं कौतुक करतील. तुमची रंगीबेरंगी पानं गोळा करतील आणि तुमच्याबरोबर फोटो काढून घेतील.’’

मेपलचं सारानं केलेलं कौतुक ऐकून त्याला खूप छान वाटलं. कोणतीही इजा न होता आपलं फक्त कौतुक होणार यावर ते खूश झालं. आपला हा उपयोग त्याला मनापासून पटला व ते खुदकन् हसलं. त्याला हसताना बघून इतर झाडं व मेपलचे मित्रपण खूश झाले. आपल्या मित्राला आनंदी बघून त्या सर्वांनी साराचे आभार मानले.

mrinaltul@hotmail.com