मित्रांनो, अनेकदा आपल्या अनेक पराभवांचं किंवा मानहानीचं कारण आपले ‘हितशत्रू’ असं आपण सांगतो. आणि हितशत्रू म्हणजे कोण? जे आपल्या हिताला बाधा आणतात ते शत्रू. आपल्या आजूबाजूला असतातच असे शत्रू. काही वेळा ते आपण चटकन ओळखतो, काही वेळा ओळख पटते तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते; पण ते असतात. त्यांच्याशी आपल्याला सामना करावा लागतो हे शंभर टक्के सत्य आहे. पण फक्त तेच हितशत्रू आपल्या अहितासाठी टपलेले असतात असं नाही, तर काही हितशत्रू असे असतात जे आपणच निर्माण करतो, कळत किंवा नकळत त्यांची जोपासना करतो आणि आपल्या हिताला बाधा आणायला आपणच कारणीभूत ठरतो. असे हितशत्रू म्हणजे आपली पालुपदं. आपलं प्रत्येकाचं काही ना काही पालुपद असतं आणि अनेकदा ते आपल्या हिताला मारक ठरत असतं. तर अशाच हितशत्रूंबाबत आपण थोडीशी चर्चा करणार आहोत या वर्षभर. यात सगळीच पालुपदं येतील असं नाही, पण आपलं पालुपद ओळखायला आणि त्याला उखडून टाकायला याचा नक्कीच उपयोग होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा