सात्विका आता मोठय़ा शाळेत जाते. तिच्या आजोबांनी लहानपणापासूनच तिला रोज पेपर वाचायची सवय लावली आहे. संध्याकाळी सगळे घरी आले की पेपरमधल्या बातम्यांबद्दल सगळे मिळून चर्चाही करतात. सात्विका लहान असली तरी तिच्या परीने तिचे मुद्दे मांडायला तिला नेहमीच प्रोत्साहन दिलं जातं. सात्विकाचा मामा त्याच्या ऑफिसच्या कामासाठी दोन दिवस मुंबईत म्हणजे सात्विकाकडे आलाय. तो सी.ए. आहे. सध्या तर रोज पेपर उघडल्यावर जुन्या नोटा, नवीन नोटा, ‘demonetization’ असं काय काय वाचायला मिळतंय. त्यामुळे संध्याकाळच्या चर्चासत्रात आर्थिक घडामोडींबद्दल मामाचं मत ऐकण्याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. या चर्चा-गप्पांदरम्यान मामाला जाणवलं की सध्याच्या आर्थिक घडामोडींवर सात्विकाही विचारपूर्वक बोलते आहे. तिला अर्थशास्त्र हा विषय शाळेच्या अभ्यासात आहे आणि बऱ्याच जणांना कठीण वाटणारा हा विषय सात्विकाला मात्र इंटरेस्टिंग वाटतोय. सात्विकाला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थशास्त्राशी- मार्केटशी संबंधित काहीतरी खेळ तिच्यासाठी आणायला हवा असं मामाला वाटलं आणि त्याने लगेचच ‘मोनोपॉली’ नावाचा खेळ तिला आणून दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा