कोणाचेही लक्ष सहज वेधून घेईल अशी आकाशातील विशेष घटना म्हणजे चंद्रग्रहण. त्यातही ते खग्रास असेल तर विलोभनीय. चंद्रग्रहण पाहण्यासाठी मुद्दाम विशिष्ट ठिकाणी जावे लागत नाही. कोणत्याही उपकरणाची मदत लागत नाही. नुसत्या डोळ्यांनी ते बिनधास्त पाहता येते. चंद्रग्रहणासाठी पौर्णिमा असावी लागते हे सर्वश्रुतच आहे. बऱ्याच सणांनी पौर्णिमेचे आरक्षण करून ठेवले आहे. वट, गुरू, राखी, कोजागिरी, त्रिपुरी, होळी, इ. शब्दांपुढे पौर्णिमा शब्द जोडला की आपला सांस्कृतिक वारसा उलगडत जातो. समृद्ध संस्कृतीची जाणीव होते. एकाच गोष्टीवर हक्क सांगण्याची सणांची मक्तेदारी आहे असे मात्र नाही. पौर्णिमेवरही ग्रहणाचे सावट आहे. चंद्र सरळपणे पृथ्वी सूर्याच्या पातळीत पृथ्वीभोवती फिरत असता तर आपण पूर्ण चंद्राच्या सौंदर्याला मुकलो असतो. चंद्राने पृथ्वीभोवती परिभ्रमण करताना थोडा तिरकेपणा राखला आहे.
म्हणूनच काही पौर्णिमांनाच चंद्रग्रहण होऊ शकते. अन्यथा प्रत्येक पौर्णिमेने ग्रहणाशी मत्री केली असती. चंद्राची कक्षा – सूर्य पृथ्वी पातळीला ज्या दोन िबदूत छेदते त्या िबदूपाशी चंद्र असताना पौर्णिमा झाली तर चंद्रग्रहण होते. हे िबदू म्हणजे सूर्य-पृथ्वी-चंद्र एका पातळीत आणि एका रेषेत असण्याचे ठिकाण. या िबदूंना पुराणकथेत राक्षस म्हणून संबोधले आहे. राहू आणि केतू असे त्यांचे नामकरणही झाले आहे. हे राक्षस म्हणे चंद्राला गिळतात, ग्रासतात म्हणजेच ग्रहण होते अशी कल्पना. पृथ्वीची अंतराळातील शंकूच्या आकाराची सावली १४ लक्ष कि.मी. लांबीची असते. त्यामुळे केवळ ४ लक्ष किमीवर असलेला चंद्र पृथ्वीच्या सावलीतून प्रवास करतो. तो सावलीच्या अगदी मध्यातून गेला तर मोठय़ा बोगद्यात गाडी शिरावी तसा सावलीतून एक ते दीड तास प्रवास करतो. म्हणजे खग्रास ग्रहण होते. त्याचा मार्ग थोडा तिरकस असला तर काही भाग सावलीच्या बाहेर राहतो. मग खंडग्रास ग्रहण होते. खरं तर पृथ्वीच्या सावलीत पूर्णपणे सापडलेला चंद्र दिसताच कामा नये. त्याला शोधायची वेळ आली पाहिजे. पण पृथ्वीच्या वातावरणाने त्याला यापासून वाचविले आहे. पृथ्वीच्या वातावरणातून प्रकाश आरपार जातो आणि चंद्रावर पडतो त्यामुळे तांबूस चंद्र आपल्याला दिसू शकतो. चंद्राचा मार्ग जरा जास्त तिरका असला तर चंद्र पृथ्वीच्या विरळ छायेतून प्रवास करतो, त्यास छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात. ते आपल्या चर्मचक्षूंना जाणवत नाही.
२००१ ते २०२५ या पंचवीस वर्षांच्या कालखंडात २००२, २०१६ आणि २०२० या तीन वर्षांत एकही चंद्रग्रहण नाही. (म्हणजे डोळ्यांना जाणवणारे ग्रहण नाही.) उर्वरित वर्षांत मिळून एकूण २३ खग्रास आणि १३ खंडग्रास चंद्रग्रहणे आहेत.
चंद्रग्रहणाची एखादी तारीख कळली तर त्यापुढचे चंद्रग्रहण निश्चित केव्हा होईल हे तुम्हालाही सांगता येईल. त्या तारखेत १८ वष्रे आणि १० दिवस मिळविले की झाले काम! उदा. ३० जानेवारी १९७२ नंतर ९ फेब्रुवारी १९९० रोजी ग्रहण झाले. वर दिलेल्या कालावधीनंतर घडून येणाऱ्या अशा तारखांची- म्हणजे ग्रहणांची एक मालिकाच तयार होईल. या शृंखलेला ‘ग्रहण कुटुंब’ म्हणतात. चंद्रग्रहणाच्या एका कुटुंबात अशी १५ ग्रहणे होतात आणि ती मालिका ८५० ते ९०० वष्रे चालते. आपल्याला दिसणारे प्रत्येक चंद्रग्रहण हे कोणत्यातरी ‘कुटुंबा’चा सभासद असतेच.
ल्ल
ँ५ेल्ली@ॠें्र’.ूे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा