साहित्य : काळा, पिवळा, पांढरा कागद (कार्डपेपर), कात्री, पंच मशीन, काळा स्केचपेन, सॅटिन रिबीन, गम.
कृतीlok08 : आकृतीत दाखविल्याप्रमाणे काळ्या कागदाच्या घडय़ा घालून घ्या. पिवळ्या कागदाचा छोटासा दुहेरी चौकोन करून घ्या व गोलाकारात (आकृतीत दाखविल्याप्रमाणे) कान कापून घ्या. उंदराच्या दोन्ही बाजूस बारीकशी चीर देऊन कानाची कोनाची बाजू आत सरकवून चिकटवा. पंच मशीनने पांढऱ्या टिकल्या काढा व डोळे चिकटवा. सॅटिनची रिबीन मागील बाजूस दोन त्रिकोणामध्ये सरकवून चिकटवा. झाले आपले उंदीरमामा तयार!lr26

Story img Loader