आपण पृथ्वीतलावर राहतो. पृथ्वी सूर्यमालिकेतील एक ग्रह आहे. ज्या सूर्याभोवती ग्रह फिरतात अशा अब्जावधी ताऱ्यांचे एक विश्व बनलेले आहे. ते विश्व म्हणजे आपली आकाशगंगा किंवा मिल्की वे. अर्थात् आकाशगंगेतील अब्जावधी तारकांची वसाहत हा एकूण विश्वाचा एक भाग आहे. पोळ्या करायचं लाटणं जसं टोकाला निमुळतं होत जातं तसा काहीसा आपल्या दीíघकेचा आकार आहे.
मधला केंद्र भाग थोडा फुगीर आहे. मात्र, केंद्रापासून एका पातळीत तिला अनेक गोलाकार फाटे फुटलेले आहेत. दिवाळीतील हात चक्र फिरताना जसे फाटे फुटावेत तसे हे आहे. म्हणून आपल्या दीíघकेचे वर्णन सíपलाकार (Spiral ) दीíघका असे केले जाते.
आपली ही आकाशगंगा आडव्या ठेवलेल्या चाकासारखी आहे, असेही म्हणता येईल. या चाकाच्या परिघाचा भाग म्हणजे आपल्याला दिसणारा आकाशगंगेचा दुधाळ पट्टा. हा पट्टा दक्षिणोत्तर दिशेत थोडासा तिरकस दिसतो. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात ह्या पट्टय़ाचा केंद्रभाग जो अत्यंत तेजस्वी आहे तो पहाटे दक्षिण-पूर्व कोपऱ्यात दिसतो. जून-जुलमध्ये हाच भाग सायंकाळी सूर्यास्तानंतर उगवतो. आपल्या आकाशगंगेचे केंद्र धनू राशीत आहे.
आपल्या सूर्याची जागा दीíघकेच्या केंद्रापासून सुमारे ३०,००० प्रकाशवर्ष अंतरावर आहे. आपली दीíघका बशीसारखी, चाकासारखी आहे, पण हे चक्र अति विशाल आहे. या चक्राच्या एका टोकाकडून निघालेला प्रकाश विरुद्ध टोकावर पोहोचायला सुमारे एक लाख वष्रे लागतात.
या विश्वात स्थिर असे काहीच नाही. आपला सूर्य या आकाशगंगेच्या केंद्राभोवती प्रदक्षिणा करीत आहे. सेकंदाला सुमारे २५० किलोमीटर असा त्याचा भ्रमण वेग आहे. आणि तरीही एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास त्याला २२ कोटी ५० लक्ष वष्रे लागतात. या काळाला ‘कॉस्मिक इयर’ असे म्हणतात.
आकाशगंगेचा पट्टा म्हणजे अगणित तारकांचा समूह, ही समज दुर्बणिीच्या शोधामुळे आली. गॅलिलिओने वेध घेऊन हे अनुमान केले. अनेक शास्त्रज्ञ, तंत्रविज्ञानाची प्रगती यामुळे आकाशगंगेचे विविध स्वरूप आपल्याला आता कळू लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा