ऐतिहासिक घटनांचे
इतिहास विषयाची
बंडूला नावड होती
उत्तर पत्रिकेत त्याची
येत असे प्रचिती
याची टोपी त्याला
बिनधास्त घालावयाचा
ऐतिहासिक घटनांचे
तीन तेरा वाजवायचा
आग्य्राचा ताजमहाल म्हणे
टाटा-बिर्लानी बांधला
शाहजहान बादशहांना
तो भाडय़ानं दिला
पहिल्या स्वातंत्र्य युद्धात
चांदबीबी लढली
झाशीच्या राणीनं
तिला साथ दिली
अहिसेचा मंत्र
हिटलरने जपला
महात्मा नामकरणानं
त्याचा गौरव केला
द्रौपदीला रावणानं
लंकेत पळवून नेलं
दशरथाच्या रामानं
तिला परत आणलं
पानिपतच्या युद्धात
अघटितच घडले
युद्ध न करताच
इंग्रज शरण आले
उत्तरपत्रिका वाचून
गुरूजी चक्रावले
शून्य गुण देऊन
बंडूला अनुत्तीर्ण केले