आई अभ्यास करू कसा?
जरा सांग तरी मला..
बाहेर चालूये मस्ती
दंगा सगळे करिती
गृहपाठ करू कसा?
जरा सांग तरी मला
आई..
आणखी वाचा
गार गार थंडी किती
बघ बोटे आखडली
हाती पेन धरू कसा?
जरा सांग तरी मला
आई..
फॅन फिरे गरागरा
पाने उडती भराभरा
किती वेळ झेलू वारा?
जरा सांग तरी मला
आई..
पाऊस पडतो टपटप
होडी धावे झपझप
कसे आवरू मन सैरावैरा?
जरा सांग तरी मला
आई..
चार्ली मज आठवतो
डोळ्यांपुढे मिकी येतो
वाचन मी करू कसा?
जरा सांग तरी मला
आई..
– बालाजी मदन इंगळे