|| प्राची बोकिल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘‘आज्जी, गजरा घ्या नं!’’

‘‘कसा दिला?’’

‘‘मोठा वीसला. ल्हान धाला.’’

‘‘महाग आहे गं!’’

‘‘मोगरा लई महाग मिळाला आज मंडईत.’’

‘‘बरं, बरं. एक मोठा दे.’’

‘‘घ्या दोन. पस्तीसला देते.’’ क्षणभर विचार करून प्राजक्ता फुलवाली म्हणाली. एका खुंटीला लटकवलेल्या अनेक गजऱ्यांमधून तिने पटापट दोन मोठे ताजे गजरे काढले आणि कागदाच्या पुडीमध्ये बांधून आजींना दिले.

एव्हाना आजी तिचं ते झोपडीवजा दुकान न्याहाळू लागल्या. त्यांच्याच सोसायटी गेटच्या भिंतीलगतच्या फुटपाथवर तिचं हे दुकान होतं. दुकान लहान असलं तरी टापटिप होतं. पिवळा-केशरी झेंडू, पांढरी-पिवळी शेवंती, अनेक रंगांचे गुलाब-जब्रेरा, निशिगंध, सोनचाफा, बेल, तुळस, दुर्वा अशा बऱ्याच फुलांच्या टोपल्या तिच्या दुकानात होत्या. ती त्या मांडण्यात गर्क होती. पाठीमागे पंढरपूरच्या विठ्ठलाची तसबीर टांगलेली होती. तसबिरीच्या शेजारी लहानापासून मोठे असे अनेक हार-गजरे लावलेले होते. विठ्ठलाच्या तसबिरीलाही निशिगंध-तुळशीचा हार वाहिला होता.

दुकानामध्ये लटकवलेल्या चार-पाच पाटय़ा आता आजी वाचू लागल्या. पाटय़ांवरचं अक्षर अगदी मोत्यांच्या दाण्यांसारखं रेखीव होतं. तसा इतर पाटय़ांवर नेहमीचाच मजकूर होता- ‘प्लास्टिक बॅग मागू नये’, ‘फुलपुडी रुपये १०/-’ वगरे. पण एका पाटीने मात्र आजींचं लक्ष खास वेधून घेतलं. त्या पाटीवर मोठय़ा अक्षरांत दुकानाचं नाव लिहिलं होतं – ‘फुलांची पंढरी’! खरोखरंच त्या सुबकपणे लावलेल्या निरनिराळ्या हार-फुलांना पाहून पंढरपूरचा विठोबाही प्रसन्न झाला असता.

‘‘सुरेख मांडली आहेस हो फुलं! आणि दुकानाचं नावपण एकदम छान आहे तुझ्या!’’

‘‘माझ्या प्रसाददादालाबी आवडतं हे नाव. मीच ठेवलंय. आम्ही मूळचे पंढरपूरचे नं!’’

‘‘आणि तुझं नाव गं काय?’’

‘‘प्राजक्ता. पण म्हणतात छकुली.’’

‘‘अरे व्वा! छान आहे नाव!’’ असं म्हणत आजींनी ती गजऱ्यांची पुडी घेतली. प्राजक्ताला पसे देताना त्यांना तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक दिसली. त्यांची तिच्याविषयीची उत्सुकता वाढली.

‘‘विसाची फुलपुडी देणार का?’’ प्राजक्ताने दचकून वर बघितलं. दुकानामध्ये लावलेल्या बल्बच्या प्रकाशात ती काहीतरी लिहीत बसली होती. कालच्याच आजी होत्या. त्याही तिच्या चांगल्या लक्षात राहिल्या होत्या.

‘‘मिळेल की!’’ प्राजक्ता गोड हसली.

‘‘अभ्यास करत होतीस?’’ आजींनी कुतूहलाने विचारलं.

‘‘न्हाई. आजचा हिशेब लिहितेय.’’

‘‘शिकतेस शाळेत?’’

‘‘हो! जवळच्याच कार्पोरेशनच्या शाळेत. सहावीला आहे आता.’’

‘‘तू एकटी पाहतेस दुकान?’’ आजींना आश्चर्य वाटलं.

‘‘माझा प्रसाददादा पाहतो. पहाटे मंडईत जाऊन फुलं आणतो, ती निवडतो. मग दुकानावर बसतो. नंतर कॉलेज करतो. संध्याकाळी पुन्हा येतो. खूप मेहनत घेतो. तो पंधरावीला हाये यंदा. त्याला संध्याकाळी क्लास असतो म्हणून थोडा वेळ मी येते. मला हार-गजरे करायला खूप आवडतात. ते करत बसते.’’

‘‘कुठे राहतेस?’’

‘‘त्या नव्या विठ्ठल-रखुमाई मंदिराजवळ.’’

‘‘घरी कोण कोण असतं?’’

‘‘दादा आणि मी!’’

‘‘आई-वडील?’’

‘‘ती विठाईच आमचे आई-बाप.’’ हे ऐकून आजीने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि फुलपुडीचे पसे देऊन त्या सोसायटीमध्ये शिरल्या.

‘‘आज्जी, आज हे कोण पिल्लू आणलं बरोबर?’’ सोसायटीमध्ये शिरताना प्राजक्ताने आजींना पाहिलं तसा तिने त्यांना पाठीमागून आवाज दिला.

‘‘माझा नातू.’’ आजी तिच्यापाशी येत म्हणाल्या.

‘‘लई गोड हाय.’’ असं म्हणत प्राजक्ताने हाताशी असलेल्या मोगऱ्याच्या टोपलीमधून ओंजळभर फुलं पुडीत बांधून आजींजवळ दिली.

‘‘कशाला गं ही?’’ आजींना आश्चर्य वाटलं.

‘‘असंच. बाळासाठी.’’

‘‘किती देऊ याचे?’’

‘‘मी पसे मागितले का आज्जी?’’ प्राजक्ता लटकं रागवत म्हणाली.

तसं आजी हसल्या. ‘प-पचा हिशेब ठेवणारी मोठी माणसं एकीकडे आणि हातावर पोट असणारी ही लहानगी प्राजक्ता एकीकडे. किती सहज आणि प्रेमाने देऊ केली तिने तिची फुलं!’ आजीच्या मनात विचार आला आणि त्यांनी ती फुलं घेतली.

‘‘छकुले, तू काल दिलेल्या मोगऱ्याच्या फुलांचा हार बनवून आजोबांनी आमच्या देव्हाऱ्यातल्या विठ्ठलाच्या तसबिरीला घातला हो!’’ दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आजी मुद्दामच प्राजक्ताला दुकानावर सांगायला आल्या. प्राजक्ता मनापासून हसली.

‘‘आजी, तुम्ही गेलाय कधी पंढरपूरला?’’

‘‘हो! बरेचदा. तू पंढरपूरची नं? मग तिथला विठोबा पाहिला असशीलच.’’

‘‘न्हाई आठवत. दादा सांगतो, ल्हान असतान् पाहिला होता येकदा.’’

‘‘मग दोघे जा की पाहायला.’’

‘‘आता हे दुकानच आमचं पंढरपूर, आज्जी.’’ प्राजक्ता समाधानाने म्हणाली.

यानंतर प्राजक्ता दोन-एक आठवडे आजींना काही दिसलीच नाही. तिच्या दुकानातल्या सगळ्या वस्तू गोणपाटाने झाकलेल्या आजी रोज पाहायच्या. शेवटी न राहवून त्यांनी आजूबाजूच्या लोकांकडे तिच्याबद्दल चौकशी केली. तेव्हा समजलं की तिच्या प्रसाददादाला डेंग्यू झाल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. बघायला दुसरं कुणी नव्हतं म्हणून ती दिवस-रात्र तिथेच असायची. त्यामुळे दोघंही दुकानावर येत नव्हते. तिची शाळाही बुडाली होती.

‘‘छकुले, काय झालं गं हे?’’ त्यानंतर दोन-तीन दिवसांनी जेव्हा प्राजक्ता आजींना भेटली तेव्हा ती फुटपाथवर फतकल मारून बसली होती. तिच्या शेजारी तिचा प्रसाददादा डोक्याला हात लावून रडत बसला होता. आजूबाजूला त्यांच्या पंढरीचं सगळं सामान विखुरलेलं होतं. फुलंही वाया गेली होती.

‘‘बघा नं आज्जी, रस्ता मोठा करणारेत तर पाडलं आमचं दुकान. आम्ही काही दिवस नव्हतो तर आम्हाला कुणी सांगितलंबी न्हाई.’’

‘‘छकुले, आता काय करायचं गं? चांगलं बस्तान बसलं होतं इथे आपलं. आता कुठे जाणार?’’ प्रसाददादा रडवेल्या स्वरात म्हणाला.

‘‘अरे दादा, रडतोस काय असा? त्या विठाईच्या मनात नक्की चांगलं काहीतरी असेल बघ आपल्यासाठी!’’ प्राजक्ता त्याला सावरत म्हणाली. आजींना त्या लहानग्या प्राजक्ताच्या समंजसपणाचं खूप कौतुक वाटलं. पण तेव्हा त्याही काहीच करू शकत नव्हत्या. दोघांना थोडा धीर द्यायचा प्रयत्न करून त्या नाइलाजाने तिथून निघून गेल्या.

‘‘काका, हार घेता का विठ्ठलासाठी? मावशी, गजरा देऊ का रखुमाईकरिता?’’ प्राजक्ता येणाऱ्या-जाणाऱ्यांना आस्थेने विचारात होती. नव्या बांधलेल्या विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या प्रवेशद्वारालगत प्राजक्ता आणि प्रसाददादाने मिळून त्यांची ‘फुलांची पंढरी’ पुन्हा वसवली होती. आषाढी दोन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे देवळाबरोबर त्यांची पंढरीही दिव्यांच्या माळांनी सजली होती.

‘‘आज्जीऽऽऽ!’’ एवढय़ात दुकानाच्या दिशेने आजींना पाहून प्राजक्ताने हाक मारली.

‘‘आज तुझी पंढरी एकदम मस्त सजलीये, छकुले!’’

‘‘तुमच्याचमुळे. आमच्यावर इश्वास दाखवून ही जागा दिलीत म्हणून झालं सगळं.’’ प्राजक्ता दुकानातून बाहेर येत म्हणाली.

‘‘अगं, आजोबा विश्वस्त आहेत या मंदिराचे. अजून नवीन असल्यामुळे इथे जवळपास कुणी फुलवाले नव्हते. आणि तुम्हा दोघांची मेहनत दिसत होती आम्हाला. म्हणून सगळ्यांच्या संमतीने दिली तुम्हाला ही जागा, इतकंच.’’

‘‘तेव्हा मी म्हटलं नव्हतं? माझ्या विठ्ठलाच्या मनात नक्की काहीतरी चांगलंच असणार. तिथल्यापरीस इथे उत्पन्नबी वाढलंय आमचं.’’ प्राजक्ता आत्मविश्वासाने म्हणाली.

‘‘ही खरी श्रद्धा, छकुले; वाईटातसुद्धा चांगलं पाहण्याची. तेव्हा तुझा प्रसाददादा किती खचला होता! पण तू त्याला धीर दिलास. धाकटी असून त्याची ताई झालीस.’’

‘‘ताई नाही, आईच म्हणा!’’ इतक्यात प्रसाददादाही तिथे आला.

‘‘दादा, भलतंच तुझं!’’ प्राजक्ता लाजली.

‘‘आज्जी, आमचे आई-वडील लहानपणीच गेले. माझ्या छकुलीला तर ते आठवतही नाहीत. ती नेहमी मला म्हणत असते, की ती विठाई म्हणजेच आमचे आई-बाप. पण आज ही छकुलीच खऱ्या अर्थाने झालीये ‘विठाई माझी’!’’

prachibokil@yahoo.com