कापडावर नक्षी-कशिदा काढण्याच्या कलेला भरतकाम म्हणतात, हे तुम्हाला माहीत आहेच. ह्या सुट्टीत तुम्हाला एखादा छोटा रुमाल, टेबलक्लॉथ किंवा स्वत:च्या ड्रेसवर विविध डिझाइन्स काढून भरतकाम करायला आवडेल का? मग चला तर! सोबत तुम्हाला भरतकामाचे काही नमुने दिले आहेत. त्यात ज्या टाक्यांचा समावेश केला आहे त्यांच्या नावांची यादी दिलेली आहे. तुम्हाला चित्रासमोर योग्य त्या टाक्यांची नावे लिहायची आहेत. एका चित्रात एकापेक्षा जास्त टाके असू शकतात.
टाके : आळी टाका, उलटी टीप, कच्छी टाका, कर्नाटकी, काश्मिरी टाका, गव्हाचा टाका, धावता दोरा (कांथा), बटण होल, मोती टाका, वाय स्टिच, साखळी टाका, हलव्याचा टाका.
(भरतकाम नमुने : डॉ. अश्विनी नावडीकर यांच्या सौजन्याने)
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा