मित्रांनो, सोबत दिलेले सूचक अर्थ वापरून त्यासाठी योग्य इंग्रजी शब्द तुम्हाला शब्दकोडय़ांत भरायचे आहेत. नेहमीच्या शब्दकोडय़ांशिवाय यात थोडी जास्त गंमत करायची आहे. तुम्हाला दिसेल की, यातील काही चौकोन पिवळ्या, तर काही चौकोन जांभळ्या रंगाचे आहेत. पिवळ्या रंगांमध्ये येणाऱ्या अक्षरांतून एक शब्द बनणार आहे. तसेच जांभळ्या रंगाच्या चौकोनातील अक्षरातून आणखी एक शब्द बनणार आहे. ते तुम्हाला ओळखायचे आहेत. ते ओळखण्यासाठी मदत म्हणजे ते दोन्ही जवळपास एकाच अर्थाचे आहेत. फक्त त्यातील एक भौतिक विज्ञानानुसार सदिश राशी आहे, तर एक अदिश राशी आहे.
jyotsna.sutavani@gmail.com
आडवे शब्द :
२. यकृत
३. मिठातून मिळणारे हे मूलद्रव्य थायरॉईड ग्रंथीसाठी उपयुक्त असते.
७. संप्रेरक
८. अशुद्ध
९. किडा
उभे शब्द :
१. पाणी शुद्ध करण्यासाठी उध्र्वपातन करणे
४. हुंगणे, श्वास घेणे
५. गुरुत्व
६. आंबवणे
पिवळ्या चौकोनातील अक्षरांनी बनलेला शब्द : V E L O C I T Y जांभळ्या चौकोनातील अक्षरांनी बनलेला शब्द : S P E E D