रिक्षावाले काका ओ रिक्षावाले काका
तुमची आमची दोस्ती कुणा सांगू नका।

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिक्षामध्ये बसताना उडते झुंबड मोठी
भांडू नका, गुपचूप बसा आता दाटीवाटी
भांडखोर राजूला सारख्या मारता हाका।

गाणी-गोष्टी ऐकताना वाटते आम्हा गंमत
म्हणता सांगतो आता एक जमाडी जंमत
कान देऊन नीट आता सगळे माझे ऐका।

शाळा येता घंटा होईल, लवकर उतरा म्हणता
खूप करा अभ्यास बाळांनो, दप्तर देऊन सांगता
वर्गात जाता जाता करतो तुम्हा टाटा।

गंमत सांगतो थोडी काका, कान करा इकडे
संपल्यावरती परीक्षा ठरवा जायचे कोठे
आइस्क्रीम, भेळीवर ताव मारणार सारे।
सांगता तुम्ही जेव्हा, भेटू जूनमध्ये
खरं सांगू काका तेव्हा, डोळा पाणी येते
सुट्टीतसुद्धा भेट व्हावी अस्से सारखे वाटते।

रिक्षावाले काका ओ रिक्षावाले काका
तुमची आमची दोस्ती कुणा सांगू नका।

रिक्षामध्ये बसताना उडते झुंबड मोठी
भांडू नका, गुपचूप बसा आता दाटीवाटी
भांडखोर राजूला सारख्या मारता हाका।

गाणी-गोष्टी ऐकताना वाटते आम्हा गंमत
म्हणता सांगतो आता एक जमाडी जंमत
कान देऊन नीट आता सगळे माझे ऐका।

शाळा येता घंटा होईल, लवकर उतरा म्हणता
खूप करा अभ्यास बाळांनो, दप्तर देऊन सांगता
वर्गात जाता जाता करतो तुम्हा टाटा।

गंमत सांगतो थोडी काका, कान करा इकडे
संपल्यावरती परीक्षा ठरवा जायचे कोठे
आइस्क्रीम, भेळीवर ताव मारणार सारे।
सांगता तुम्ही जेव्हा, भेटू जूनमध्ये
खरं सांगू काका तेव्हा, डोळा पाणी येते
सुट्टीतसुद्धा भेट व्हावी अस्से सारखे वाटते।

रिक्षावाले काका ओ रिक्षावाले काका
तुमची आमची दोस्ती कुणा सांगू नका।