मित्रांनो, खेळणी हा सर्वाच्याच आनंदाचा विषय. आणि ही खेळणी जर स्वत: बनवलेली असतील तर तुम्हाला मित्र-मैत्रिणींवर छाप पाडण्यासाठी त्यांचा किती उपयोग होऊ शकेल याची कल्पना करा. आज आपण अशी एक साइट पाहणार आहोत, जी तुम्हाला कमीत कमी आणि सहजपणे उपलब्ध असलेल्या सामग्रीत मजेदार खेळणी बनवायला शिकवेल. त्या साइटचे नाव http://www.arvindguptatoys.com/films.html या साइटवर विज्ञानावर आधारित खेळणी बनविण्यास शिकवणाऱ्या शेकडो छोटय़ा छोटय़ा (अंदाजे एक ते पाच मिनिटांच्या) YouTube क्लिप्स उपलब्ध आहेत. शिवाय त्यांचे विषयवार वर्गीकरणही केलेले आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीच्या विषयातील खेळणी शोधणे सोपे होते. नमुन्यादाखल https://www.youtube.com/watch?v=LubXMJs-k7c या क्लिपमध्ये शीतपेय पिण्याचा स्ट्रॉ वापरून हात हलविणारा ट्रॅफिक पोलीस कसा बनवायचा ते सांगितले आहे.
https://www.youtube.com/watch?v=mNYTJE6da2c या क्लिपमध्ये आपण Lifting Fan हे खेळणे कसे बनवायचे, ते पाहू. या खेळण्यात पंख्याद्वारे कमी दाबाचा पट्टा निर्माण करून वस्तू कशी तरंगते, हे अतिशय मनोरंजक पद्धतीने आपल्याला कळते.
अरविंद गुप्ता हे विज्ञान खेळणी बनविणारे जागतिक कीर्तीचे संशोधक आहेत. ते आयआयटी, कानपूरचे विद्यार्थी. त्यांचा जीव कारखान्यातील नोकरीत रमला नाही. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी टाकाऊ गोष्टींतून खेळणी बनविण्याचा मार्ग त्यांनी अवलंबिला आणि हा प्रयोग प्रमाणाबाहेर यशस्वी झाला. सुरुवातीला काही मोजक्याच शाळांमध्ये सुरुवात करून पुढे तब्बल सोळा हजार सरकारी शाळांतून हा प्रकल्प राबविला गेला.
खेळण्यांसंबंधी त्यांची अनेक पुस्तके मराठीसह विविध भाषांमध्ये उपलब्ध आहेत. याचीच पुढची पायरी म्हणजे वर उल्लेख केलेली साइट. भारतीय भाषांबरोबरच खेळणी बनविण्याच्या या YouTube क्लिप्स फ्रेंच, स्पॅनिश, रशियन, जपानी, कोरियन इत्यादी भाषांतही उपलब्ध आहेत. मला खात्री आहे की ही साइट तुम्हाला नक्कीच आवडेल!
मनाली रानडे
मनोरंजक विज्ञान खेळणी
मित्रांनो, खेळणी हा सर्वाच्याच आनंदाचा विषय. आणि ही खेळणी जर स्वत: बनवलेली असतील तर तुम्हाला मित्र-मैत्रिणींवर छाप पाडण्यासाठी त्यांचा किती उपयोग होऊ शकेल याची कल्पना करा.
आणखी वाचा
First published on: 22-02-2015 at 03:33 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Science game brain games