दिवाळीच्या सुट्टीत इंग्लिश बोलण्याचा सराव करायचा असं निवेदिता आणि तिच्या आई-बाबांनी ठरवलं होतं. ‘मला भूक लागली आहे’ किंवा ‘मी खेळायला जाऊ का?’ अशी छोटी छोटी, पण रोजच्या उपयोगाची वाक्यं इंग्लिशमध्ये बोलत त्यांनी या उपक्रमाला सुरुवातही केली. बोलण्याच्या जोडीला इंग्लिश व्याकरणाची ओळख करून देणारा एखादा खेळ मिळाला तर बरं होईल, असं आई-बाबांना वाटत होतं. असं काही शोधायचं काम निवेदिताची आत्या उत्साहाने करते! आईने तिला फोन करून सांगितल्यावर आत्याने इंटरनेट, खेळांची दुकानं, मित्र-मैत्रिणी अशी सगळी सूत्रं वापरून ‘सेन्टेन्स मास्टर’ नावाचा एक खेळ शोधून काढला आणि रविवारी भल्या सकाळी ती तो खेळ घेऊन निवेदिताच्या घरी हजर झाली. सध्या सुट्टी सुरू असल्यामुळे निवेदिता आईने दहा हाका मारल्याशिवाय उठतच नाही. पण आत्या आलीय आणि तिने नवा खेळ आणलाय म्हटल्यावर निवेदिता पहिल्या हाकेलाच अंथरुणातून उठली. आत्याचा चहा होईपर्यंत स्वत:हून पांघरुणाची घडी करून, दात घासून दुधाचा कप घेऊन आत्याजवळ येऊन बसली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा