सरूचं अंगण
पारूचं अंगण
दोघींच्या अंगणात
गोल गोल रिंगण.

सरूच्या अंगणात
जाईचं फूल
पारूच्या अंगणात
हसरं मूल.

फूल नि मूल
खुदकन हसतात
सरू नि पारू
उगाच भांडतात.

सरूच्या अंगणात
आभाळराणी
पारूच्या अंगणात
वन राणी.

राण्यांचं रानी
पाऊसपाणी
सरू नि पारूची
रड-रड गाणी.

Story img Loader